राज्य बुद्धिबळ स्पर्धा सुरू
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST
१९ वर्षे गटाची राज्य बुद्धिबळ स्पर्धा सुरू
राज्य बुद्धिबळ स्पर्धा सुरू
१९ वर्षे गटाची राज्य बुद्धिबळ स्पर्धा सुरूनागपूर : १९ वर्षे गटाची महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ स्पर्धेला गुरुवारी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सभागृहात सुरुवात झाली. १२३ मुले आणि २९ मुली या स्पर्धेत सहभागी झाली आहेत.मुलांमध्ये ७७ इएलओ रेटेड बुद्धिबळपटूंमध्ये कोल्हापूरचा अनिश गांधी तसेच पुण्याचा अथर्व गोडबोले यांचा समावेश आहे. मुलींच्या गटात नागपूरची श्वेता गोळे आणि साक्षी चितांगे यांचा समावेश आहे.नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या यजमानपदाखाली आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध कान- नाक - घसा तज्ज्ञ डॉ. मदन कापरे यांच्याहस्ते झाले. यावेळी एनडीसीएचे अध्यक्ष विनोद त्रिवेदी, बलजित जुनेजा, श्रीमती शरयू बोमनवार, एमसीए सचिव दिलीप पागे, डॉ. आंबेडकर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अरविंद जोशी, उपमुख्य आर्बिटर प्रवीण ठाकरे यांची उपस्थिती होती. एनडीसीएचे सचिव के. के. बारट यांनी संचालन केले व आभार मानले. २६ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत दररोज सकाळी ९.३० आणि दुपारी ३ वाजेपासून फेऱ्या होतील. (क्रीडा प्रतिनिधी)