शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे संघाची सावध सुरुवात

By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST

आयपीएल : अजिंक्य रहाणेचे अर्धशतक

आयपीएल : अजिंक्य रहाणेचे अर्धशतक
पुणे : अजिंक्य रहाणेच्या आणखी एका शानदार खेळीच्या बळावर रायजिंग पुणे सुपर जायंटस् संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध सावध सुरुवात केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रायजिंग पुणे सुपर जायंटस् संघाने १५ षटकांत ३ बाद १00 धावा केल्या. जबरदस्त फॉर्मात असणारा अजिंक्य रहाणे ४२ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ५0 आणि ॲल्बी मॉर्कल २ धावांवर खेळत होते. कोलकाता नाईट रायडर्सकडून शकीब अल हसन याने १ गडी बाद केला.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याने नाणेफेक जिंकून महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील रायजिंग पुणे सुपर जायंटस् संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना पुणे संघाला आक्रमक फटके मारण्यापासून रोखले. त्यातच पुणे संघाची सुरुवात अपेक्षेनुरूप झाली नाही. डावाच्या चौथ्याच षटकात शकीब अल हसन याने फाफ ड्यू प्लेसिस (४) याला त्रिफळाबाद करीत कोलकाता नाईटर रायडर्स संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि स्टीव्हन स्मिथ यांनी ५0 चेंडूंत ५६ धावांची भागीदारी करताना पुणे संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला; परंतु चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जम बसलेला स्टीव्हन स्मिथ धावबाद झाला. धावबाद होण्यापूर्वी स्टीव्हन स्मिथ याने २८ चेंडूंत २ चौकारांसह ३१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या थिसारा परेरा याने जोरदार सुरुवात करताना सतीशला उत्तुंग षटकार ठोकला; परंतु याच षटकात सतीशने परेराला त्रिफळाबाद करीत कोलकाता नाईट रायडर्सला तिसरे यश मिळवून दिले. बाद होण्यापूर्वी सतीशने ९ चेंडूंत १२ धावा केल्या.
रायजिंग पुणे सुपर जायंटस् : १५ षटकांत ३ बाद १00. (रहाणे खेळत आहे ५0, स्टिव्हन स्मिथ ३१, थिसारा परेरा १२. शकीब अल हसन १/१४, सतीश १/२0)