शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जोको, सेरेनाच्या खेळीने मोहिमेची सुरुवात

By admin | Updated: August 30, 2015 02:32 IST

सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि अमेरीकेची सेरेना विलियम्स हे पुरुष व महिला गटातील अव्वल खेळाडू ३१ आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या अमेरीकन (यूएस) ओपन टेनिस ग्रँडस्लॅम

न्यूयॉर्क : सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि अमेरीकेची सेरेना विलियम्स हे पुरुष व महिला गटातील अव्वल खेळाडू ३१ आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या अमेरीकन (यूएस) ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात करतील. त्याचवेळी स्पेनचा हुकमी राफेल नदाल देखील पहिल्याच दिवशी खेळणार असल्याने टेनिसप्रेमींची उत्सुकता वाढली आहे.दिग्गज स्टेफी ग्राफ हिने १९८८ मध्ये कॅलेंडर वर्षात ग्रँडस्लॅम पुर्ण केल्यानंतर सेरेना विलियम्सला या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. तीला सलामीला रशियाच्या वितिलिया दियातचेनको विरुध्द खेळावे लागेल. गतमहिन्यात विम्बल्डन जिंकून सलग चौथी प्रतिष्ठीत स्पर्धा जिंकणाऱ्या सेरेनाचे लक्ष्य सध्या यूएस ओपन जिंकून करियर स्लॅमसह कारकिर्दीतील २२वे ग्रँडस्लॅम जिंकण्यावर असेल. सेरेनाने यूएस ओपन जिंकल्यास ती स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांशी बरोबरी करेल. पुरुष गटामध्ये दुसऱ्या यूएस ओपन विजेतेपदाचा निर्धार केलेल्या जोकोविचला पहिल्या सामन्यात ब्राझीलच्या के जाओ सोजाचे आव्हान असेल. त्याचवेळी उपांत्यपुर्व फेरीत त्याला नदालच्या तगड्या खेळाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. नदाल देखील स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी खेळणार असून क्रोएशियाचा बोर्ना कोरिच विरुध्द त्याची लढत होईल. गतविजेता क्रिएशियाचा नववा मानांकीत मरिन सिलिच अर्जेटिनाच्या के गुड्डो पेला विरुध्दच्या सामन्याने विजेतेपद राखण्याच्या मोहिमेला सुरुवात करेल. क्वीतोवाची अंतिम फेरीत धडकन्यू हेवन : स्टार टेनिसपटू पेत्रा क्वितोवाने धडाकेबाज विजय नोंदवताना चार वेळची चॅम्पियन डेन्मार्कच्या कैरोलिना वोज्नियाकीला नमवले. या दिमाखदार विजयासह क्वीतोवाने डब्ल्यूटिए हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. वर्षातील शेवटच्या ग्रँडस्लॅम यूएस ओपन पुर्वी क्वीतोवाने या स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सिध्द केले. बलाढ्य व संभाव्य विजेत्या वोज्नियाकीला सरळ दोन सेटमध्ये ७-५, ६-१ असे नमवून क्वीतोवाने बाजी मारली. दरम्यान पहिल्या सेटमध्ये ३-५ असे पिछाडीवर पडल्यानंतर क्वीतोवाने जबरदस्त पुनरागम करताना झुंजार खेळाचे प्रदर्शन केले.