बंगलोर : दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवत रविवारी रात्री फिरोजशाह कोटलावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या विजयाचा पाया रचणारा वेगवान गोलंदाज वरुण अॅरोनने आपल्या यशाचे श्रेय आॅस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कला दिले आहे. स्टार्क दुसऱ्या टोकाकडून फलंदाजांवर दडपण निर्माण करीत असल्यामुळे अन्य गोलंदाजांचे काम सोपे होते, असे अॅरोन म्हणाला. अॅरोनने युवराज सिंग व अॅन्जेलो मॅथ्यूज यांना एकापाठोपाठ बाद केले. अॅरोनला हॅट््ट्रिक मिळविता आली नसली तरी त्याने दिलेल्या धक्क्यातून डेअरडेव्हिल्स संघ अखेरपर्यंत सावरलाच नाही. डेअरडेव्हिल्स संघाचा डाव ९५ धावांत संपुष्टात आला.आरसीबी संघाने या लढतीत १० गडी राखून विजय मिळविला. आरसीबी संघाचा हा सलग दुसरा विजय आहे.टी-२० क्रिकेटमध्ये एका विशिष्ट टप्प्यावर मारा करता येत नाही. परिस्थितीनुसार टप्पा बदलणे आवश्यक ठरते, असेही अॅरोन म्हणाला. (वृत्तसंस्था)सामनावीर ठरलेला अॅरोन म्हणाला, मिशेल स्टार्क शानदार गोलंदाज असून माणूस म्हणूनही चांगला आहे. तो सुरुवातीला विकेट घेत प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करतो. तो चांगल्या फॉर्मात असून विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाजही आहे. तो एका टोकाकडून दडपण निर्माण करीत असल्यामुळे त्याचा दुसऱ्या गोलंदाजांना लाभ मिळतो.आरसीबी संघात जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. प्रत्येक विजयानंतर मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळते. गेल्या दोन सामन्यांत संघाने लौकिकाला साजेशी कामगिरी केली.यापूर्वी आयपीएल स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव या लढतीत उपयुक्त ठरला.फिटनेसबाबत बोलताना अॅरोन म्हणाला, ‘आता मी फिट आहे. सुरुवातीला पाठीच्या दुखापतीची समस्या होती. काही अन्य दुखापतींमुळे त्रस्त होतो, पण माझे कुटुंबीय, ट्रेनर व प्रशिक्षकांच्या मदतीमुळे फिटनेस मिळवता आला. आता मला कुठलीच अडचण नाही.’
स्टार्कच्या सोबतीचा लाभ : वरुण अॅरोन
By admin | Updated: April 28, 2015 00:32 IST