शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनिवासन हेच सर्व वादाचे मूळ

By admin | Updated: July 19, 2015 01:04 IST

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची

कोलकाता : ‘‘भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची बदनामी होऊनही बीसीसीआयने मौन पाळले. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी श्रीनिवासन यांनी कुठलीही पावले उचलली नाहीत, शिवाय अध्यक्षपदी चिटकून राहिले. त्यांनी आयसीसी चेअरमनपदही भूषविले. सर्व वादाचे मूळ ते स्वत: आहेत. त्यांनी आयसीसी चेअरमनपद सोडून द्यायला हवे,’’ अशी घाणाघाती टीका बोर्डाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी शनिवारी केली.श्रीनिवासन यांच्याविरुद्ध उघडपणे बंडाचे निशाण फडकविणारे मनोहर यांनी बीसीसीआयमधील घाण स्वच्छ करायची झाल्यास लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.काल रात्री बीसीसीआय प्रमुख जगमोहन दालमिया यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत आयपीएलचे सीईओ सुंदर रमन यांची ताबडतोब उचलबांगडी व्हावी, तसेच बोर्डातील व्यवहाराची सीबीआय चौकशी झाल्यास लोकांचा क्रिकेटवरील विश्वास पुन्हा कायम होईल. मुदगल समितीच्या अहवालात प्रथमदृष्ट्या श्रीनिवासन दोषी आढळले, तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला नाही. आयपीएलमध्ये पाररदर्शीपणा आणायचा झाल्यास रमन यांना हटविण्याची गरज आहे. बोर्डाकडे तपासाची कुठलीही साधने नसल्यामुळे सीबीआय चौकशी हाच पर्याय उरतो, असे मनोहर यांचे मत होते. निलंबित दोन्ही संघांची मालकी बीसीसीआय सांभाळू शकते काय, या शंकेबाबत विचारताच ते म्हणाले, की बोर्डाचे नियम अशी परवानगी देत नाहीत. बीसीसीआयचा अधिकारी खेळाडूंच्या लिलावात सहभागी होऊ शकत नाही. अशी भूमिका दुटप्पी ठरत असल्याने लोकांचा रोष वाढेल. जे वाद उद्भवले त्यासाठी आयपीएल जबाबदार नसल्याचे स्पष्ट करीत ही स्पर्धा सुरू राहायला हवी, असे मनोहर यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)२०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरण उजेडात आले तेव्हाच मनोहर यांनी बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. कुठलीही व्यक्ती संस्थेपेक्षा मोठी नसते. त्यांनी खतपाणी घातल्यामुळेच अनेक वाद उत्पन्न झाले. त्यांनी तर आयसीसी चेअरमनपदावरून ताबडतोब दूर व्हायला हवे.- शशांक मनोहर, माजी बीसीसीआय अध्यक्ष