शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांतला उपविजेतेपद

By admin | Updated: December 6, 2015 23:28 IST

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी इंडोनेशियन खेळाडू टॉमी सुगियार्तोकडून पराभूत व्हावे

मलांग : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी इंडोनेशियन खेळाडू टॉमी सुगियार्तोकडून पराभूत व्हावे लागल्याने त्याचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. ५९ मिनिटे चाललेल्या या संघर्षपूर्ण सामन्यात टॉमीने २१-१७, १३-२१, २२-२४ अशा गेमनी पराभूत करून अजिंक्यपदाचा मुकुट परिधान केला.पी. व्ही सिंधूसहीत भारताचे अनेक खेळाडू यापूर्वीच पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडल्याने श्रीकांत एकटाच या स्पर्धेत भारताची खिंड लढवीत होता. त्याने झंझावाती प्रदर्शन करीत अंतिम फेरी गाठली; परंतु १२ व्या मानांकित सुगियार्तोचे आव्हान त्याला पार करता आले नाही. सुगियार्तोचा श्रीकांतवर एकूण तिसरा, तर या वर्षातील दुसरा विजय आहे. सुगियार्तोने डेन्मार्क ओपनमध्येही श्रीकांतला हरविले होते. श्रीकांतने फक्त एकदाच २०१४ मध्ये दुबई जागतिक सुपर सीरिजमध्ये सुगियार्तोला पराभूत केले होते.सामन्यात श्रीकांतने चांगली सुरुवात केली होती. त्याने पहिला सेट २१-१७ असा जिंकला; मात्र घरच्या मैदानाचा फायदा उठवीत सुगियार्तोेने सामन्याला कलाटनी दिली. त्याने नंतरचे दोन सेट जिंकत अजिंक्यपद पटकावले.इंडोनेशिया मास्टर्सच्या अन्य सामन्यांचा निकालही रविवारी लागला. महिला एकेरीमध्ये बिगिजाओेने चेन युएईला २१-१८, २१-९ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीत इंडोनेशियाच्या टोंटशेव्ही अहमद व लिलियाना नात्सिर या जोडीने त्यांच्याच देशाच्या पविन जॉर्डन व डेबी सुसांतो या जोडीला २१-१८, २१-१३ असे पराभूत केले. महिला दुहेरीत चीनच्या तांग युआनटिंग व यु यांग या जोडीने इंडोनेशियाच्या नित्या कृष्णंदा माहेश्वरी व ग्रेसिया पोली या जोडीचा २१-१७, २१-११ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या बेरी एंग्रीयवान व रेयान एगुंग सपुत्रा या जोडीने चीनच्या चाई बाओ व हांग वेई या जोडीचा २१-११, २२-२० असे पराभूत केले.