शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांतची उपांत्य फेरीत धडक

By admin | Updated: June 24, 2017 02:08 IST

स्टार शटलर किदाम्बी श्रीकांत याने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखताना आॅस्टे्रलिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली

सिडनी : स्टार शटलर किदाम्बी श्रीकांत याने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखताना आॅस्टे्रलिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी दुसरीकडे महिला गटात भारताच्या पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल या दोन्ही प्रमुख खेळाडूंन स्पर्धेबाहेर पडावे लागले. यासह महिला एकेरी गटातील भारताचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष उपांत्यपुर्व फेरीमध्ये श्रीकांतपुढे भारताच्याच बी. साई प्रणीतचे आव्हान होते. याआधी सिंगापूर ओपन अंतिम सामन्यामध्ये प्रणीतने श्रीकांतला नमवले असल्याने हा सामना श्रीकांतसाठी महत्त्वाचा होता. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात श्रीकांतने २५-२३, २१-१७ अशी बाजी मारत आपल्या पराभवाचे हिशोबही चुकते केले. या सामन्याआधी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कोरियन खेळाडू सोन वानला नमवुन उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला होता. दरम्यान, उपांत्य फेरीत श्रीकांतपुढे आॅल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणाऱ्या चीनच्या युकी शी याचे तगडे आव्हान असेल. हा सामना जिंकण्यात श्रीकांत यशस्वी ठरला, तर तो सलग तिसऱ्या सुपर सिरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारेल. दुसरीकडे महिला गटात भारताच्या पदरी निराशा आली. पदकाचे प्रबळ दावेदार असलेले सिंधू आणि गतविजेत्या सायना या दोघीही उपांत्यपुर्व फेरीत पराभूत झाल्याने भारताचे महिला गटातील आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ताइ जु यिंगविरुद्ध पुन्हा एकदा सिंधूला पराभवाचे तोंड पहावे लागले. चीनी तैपईच्या या खेळाडूने तब्बल सातव्यांदा सिंधूला पराभवाचा धक्का दिला. सिंधूने पहिला गेम जिंकून आश्वासक सुरुवात केली. परंतु, यानंतर यिंगने सलग दोन गेम जिंकताना १०-२१, २२-२०, २१-१६ अशी बाजी मारली. दुसऱ्या सामन्यात भारताच्या सायना नेहवालला गतउपविजेत्या सुन यू विरुध्द रोमांचक सामन्यात पराभूत व्हावे लागले. तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सायनाला १७-२१, २१-१०, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)