शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका-झिम्बाब्वे कसोटी रंगतदार स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:09 IST

झिम्बाब्वेने दिलेल्या ३८८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कुशाल मेंडिसच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दिवसअखेर ३ बाद १७०

कोलंबो : झिम्बाब्वेने दिलेल्या ३८८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कुशाल मेंडिसच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दिवसअखेर ३ बाद १७० धावांची मजल मारली. अखेरच्या दिवसाचा खेळ शिल्लक असलेला हा कसोटी सामना सोमवारी चौथ्या दिवसअखेर रंगतदार स्थितीत आहे. झिम्बाब्वेने सिंकदर रजाचे (१२७) कारकिर्दीतील पहिले शतक व मॅलकम वॉलेर (६८) व कर्णधार ग्रीम क्रेमर (४८) यांच्या जोरावर चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ३७७ धावांची मजल मारली. श्रीलंकाने तीन विकेट गमावल्या असल्या तरी त्यांना लक्ष्य गाठण्याची संधी आहे. श्रीलंकेला सामन्याच्या पाचव्या दिवशी मंगळवारी विजयासाठी २१८ धावांची गरज असून, त्यांचे ७ विकेट शिल्लक आहेत. श्रीलंकाची भिस्त कुशाल मेंडिस (नाबाद ६०) व अँजेलो मॅथ्यूज (नाबाद १७) यांच्यावर अवलंबून आहे. झिम्बाब्वेला कर्णधार क्रेमरकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. त्याने सलग १९ षटके टाकताना ६७ धावांत २ बळी घेतले. क्रेमरने उपुल थरंगा (२७) व कर्णधार दिनेश चंदीमललाही (१५) बाद केले. सीन विलियम्सने दिमुथ करुणारत्नेला (४९) बाद केले. त्याआधी, सकाळच्या सत्रात ६ बाद २५२ धावसंख्येवरून पुढे खेळताना झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात ३७७ धावा उभारल्या. रजाने शतक पूर्ण करताना वॉलेरसह सातव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली. दिलरुवान परेराने (३/९५) ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर क्रेमरने रजाला चांगली साथ दिली. रजाची मॅरेथॉन खेळी रंगना हेराथने (६-१३३) संपुष्टात आणली. (वृत्तसंस्था)