ऑनलाइन लोकमतगाले, दि. १२ - आर.अश्विनचे सहा बळी आणि शिखर धवनचे अर्धशतक (५३), विराट कोहली नाबाद ४५ धावांच्या जोरावर श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व राखले. आजच्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारत ३४ षटकात दोन बाद १२८ अश्या मजबूत स्थितीत होता. भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल अपयशी ठरले. तर शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या शतकी भागीदारीने भारत मजबूत स्थितीत आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेने सावध सुरूवात केली खरी पण सहाव्या षटकात करुणारत्ने आणि पुढच्याच षटकात सिल्वा बाद झाला आणि त्यानंतर श्रीलंकेचा निम्मा संघ अवघ्या ६४ धावांत तंबूत परतला. त्यानंतर अँजलो मॅथ्यूजने (६४) कर्णधारपदाला साजेशी खेळी करत श्रीलंकेचा डावा सावरायचा प्रयत्न केला त्याला चंडीमलची (५९) साथ मिळाली. मात्र ते बाद झाले आणि श्रीलंकेचा डाव १८३ धावांत आटोपला.श्रीलंकेतर्फे करुणारत्नेने (९), सिल्वा (५), थिरीमने (१३), संगकारा (५), मुबारक (०) मोठी खेळी करण्यास अपयशी ठरले. भारताकडून आर अश्विनने सहा बळी घेतले. अमित मिश्राने २, वरूण अॅरॉन व इशांत शर्माने प्रत्येकी १ बळी घेतला.अश्विनच्या फिरकीची जादू चालल्याने श्रीलंकेचा डाव थोडक्यात आटोपला आणि भारताने पहिल्या दिवशी कसोटीवर पकड मिळवली.धावफलक :- श्रीलंका ४९.४ षटकात सर्वबाद १८३( अँजलो मॅथ्यूजने ६४, चंडीमलची ५९, हेरथ २३, थिरीमने १३ आर अश्विन - १३.४-०२-४६-०६, अमित मिश्रा - ०६-०१-२०-०२ )भारत ३४ षटकात दोन बाद १२८( धवनचे नाबाद ५३, विराट कोहली नाबाद ४५ )
श्रीलंकेचा डाव १८३ धावांत आटोपला, भारत दोन बाद १२८
By admin | Updated: August 12, 2015 17:53 IST