शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

श्रीलंका मालिका विक्रम

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

भारतीय खेळाडूंना वैयक्तिक विक्रम नोंदविण्याची संधी

भारतीय खेळाडूंना वैयक्तिक विक्रम नोंदविण्याची संधी
नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यात वैयक्तिक विक्रम नोंदवण्याची संधी राहिल. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत डेरेदाखल झाला आहे.
डावखुरा सलामीवीर शिखर धवनला मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात एक हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. शिखरने १४ कसोटी सामन्यांत ४१.५० च्या सरासरीने ९९६ धावा फटकावल्या असून एक हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ चार धावांची गरज आहे. रोहित शर्माला एक हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी या मालिकेत कसून मेहनत घ्यावी लागणार आहे. रोहितने आतापर्यंत ११ कसोटी सामन्यांत ३९.२९ च्या सरासरीने ६६८ धावा फटकावल्या आहेत. त्याला हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ३३२ धावांची गरज आहे.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फॉर्म कायम राखला तर तो या मालिकेत तीन हजार धावांचा टप्पा गाठू शकतो. विराटने ऑस्ट्रेलियात शानदार फलंदाजी करताना ७०० धावा फटकावल्या. विराटने ३४ कसोटी सामन्यांत ४५.७३ च्या सरासरीने २५६१ धावा फटकावल्या आहेत.
बांगलादेश दौऱ्यात एकमेव कसोटी सामन्याद्वारे भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या ऑफ स्पिनर हरभजन सिंगला या दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली तर तो वीरेंद्र सेहवागला (१०३ कसोटी) पिछाडीवर सोडताना सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये नवव्या स्थानावर दाखल होईल. हरभजनने आतापर्यंत १०२ कसोटी सामन्यात २२०९ धावा फटकावल्या असून ४१६ बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या जागतिक गोलंदाजांच्या यादीत तो नवव्या स्थानी आहे. हरभजनला शॉन पोलाकचा (४२१ बळी) विक्रम मोडण्याची संधी आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये हरभजनपेक्षा कपिल देव (४३४ बळी) आणि अनिल कुंबळे (६१९ बळी) यांनी अधिक फलंदाजांना बाद केले आहे. (वृत्तसंस्था)