शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका मालिका विक्रम

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

भारतीय खेळाडूंना वैयक्तिक विक्रम नोंदविण्याची संधी

भारतीय खेळाडूंना वैयक्तिक विक्रम नोंदविण्याची संधी
नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना श्रीलंका दौर्‍यात वैयक्तिक विक्रम नोंदवण्याची संधी राहील. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत डेरेदाखल झाला आहे.
डावखुरा सलामीवीर शिखर धवनला मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात एक हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. शिखरने १४ कसोटी सामन्यांत ४१.५० च्या सरासरीने ९९६ धावा फटकावल्या असून, एक हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ चार धावांची गरज आहे. रोहित शर्माला एक हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी या मालिकेत कसून मेहनत घ्यावी लागणार आहे. रोहितने आतापर्यंत ११ कसोटी सामन्यांत ३९.२९ च्या सरासरीने ६६८ धावा फटकावल्या आहेत. त्याला हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ३३२ धावांची गरज आहे.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील फॉर्म कायम राखला तर तो या मालिकेत तीन हजार धावांचा टप्पा गाठू शकतो. विराटने ऑस्ट्रेलियात शानदार फलंदाजी करताना ७०० धावा फटकावल्या. विराटने ३४ कसोटी सामन्यांत ४५.७३ च्या सरासरीने २५६१ धावा फटकावल्या आहेत.
बांगलादेश दौर्‍यात एकमेव कसोटी सामन्याद्वारे भारतीय संघात पुनरागमन करणार्‍या ऑफस्पिनर हरभजनसिंगला या दौर्‍यात दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली तर तो वीरेंद्र सेहवागला (१०३ कसोटी) पिछाडीवर सोडताना सर्वाधिक कसोटी सामने खेळणार्‍या भारतीय खेळाडूंमध्ये नवव्या स्थानावर दाखल होईल. हरभजनने आतापर्यंत १०२ कसोटी सामन्यांत २२०९ धावा फटकावल्या असून, ४१६ बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी घेणार्‍या जागतिक गोलंदाजांच्या यादीत तो नवव्या स्थानी आहे. हरभजनला शॉन पोलाकचा (४२१ बळी) विक्रम मोडण्याची संधी आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये हरभजनपेक्षा कपिलदेव (४३४ बळी) आणि अनिल कुंबळे (६१९ बळी) यांनी अधिक फलंदाजांना बाद केले आहे. (वृत्तसंस्था)