शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

श्रीलंका पराभूत : दिलशानची निवृत्ती

By admin | Updated: August 29, 2016 01:50 IST

य जॉर्ज बेली (७०) व मॅथ्यू वेड (४२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने रविवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर दोन गडी राखून विजय संपादन केला

दाम्बुला : य जॉर्ज बेली (७०) व मॅथ्यू वेड (४२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने रविवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर दोन गडी राखून विजय संपादन केला. श्रीलंकेच्या दिनेश चांदीमलची शतकी खेळी व्यर्थ गेली. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली.श्रीलंकेने दिनेश चांदीमल (१०२) व शेवटचा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या दिलशान (४२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ४९.२ षटकांत २२६ धावांची मजल मारली. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने आपल्या पहिल्याच षटकात दनुष्का गुणातिलक (५) याला बोल्ड केले. जोश हेजलवुडने कुसल मेंडिसला (४) तंबूचा मार्ग दाखविता श्रीलंकेची २ बाद २३ अशी अवस्था केली. कारकिर्दीतील अखेरची वन-डे खेळणारा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान (४२) आणि यष्टिरक्षक फलंदाज चांदीमल (१०२) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. दिलशानला फिरकीपटू अ‍ॅडम जंपाने (३-३८) माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. आॅस्ट्रेलियाची डावाची सुरुवात काहीशी डळमळीत झाली. वॉर्नर (१०), मार्श(१) लवकर बाद झाल्यानंतर अ‍ॅरॉन फिंच (३०) व जॉर्ज बेली (७०) यांनी डाव सावरला. बेलीचा अडथळा प्रसन्नाने दूर केला. त्यानंतर मॅथ्यू वेड (४२) याने हेड (३६) याच्यासह महत्वपूर्ण भागीदारी केली. आॅस्ट्रेलियाने ४६ षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात २२७ धावा करत विजय साकारला. श्रीलंकेच्या मॅथ्यूज, परेरा व अपान्सो यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.दिलशानने ३३० वन-डे सामने खेळताना २२ शतके व ४७ अर्धशतकांच्या मदतीने कारकिर्दीत एकूण १०२९० धावा फटकावल्या. दिलशान माघारी परतला त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत या खेळाडूला मानवंदना दिली. संक्षिप्त धावफलक़श्रीलंका ४९़२ षटकांत सर्वबाद - २२६़ (मेंडिस झे़वॉर्नर गो़ हेजलवूड ४२, चंदीमल १०२, डिसिल्वा १२, परेरा १७,अ‍ॅडम जंम्पा ३/३८, स्टार्क २/४२, हेस्टींग्ज २/४१, फॉल्कनर २/४४)़आॅस्ट्रेलिया : ४६ षटकांत ८ बाद २२७ (अ‍ॅरॉन फिंच ३०,जॉर्ज बेली ७०,टी.एम. हेड ३६, मार्श वेड ४२, स्टार्क १२. मॅथ्यूज २/३०, अपान्सो २/४४, परेरा २/४५)़