शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेचा डाव १८३ धावांत आटोपला

By admin | Updated: August 12, 2015 15:38 IST

आर.अश्विनच्या प्रभाव फिरकीमुळे पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा डाव अवघ्या १८३ धावांत संपुष्टात आला.

ऑनलाइन लोकमत

गाले, दि. १२ -  आर.अश्विनचे सहा बळी आणि शिखर धवनचे अर्धशतक (५३), विराट कोहली नाबाद ४५ धावांच्या जोरावर श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व राखले. आजच्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारत ३४ षटकात दोन बाद १२८ अश्या मजबूत स्थितीत होता. भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल अपयशी ठरले. तर शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या शतकी भागीदारीने भारत मजबूत स्थितीत आहे.

 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेने सावध सुरूवात केली खरी पण सहाव्या षटकात करुणारत्ने आणि पुढच्याच षटकात सिल्वा बाद झाला आणि त्यानंतर श्रीलंकेचा निम्मा संघ अवघ्या ६४ धावांत तंबूत परतला. 

त्यानंतर अँजलो मॅथ्यूजने (६४) कर्णधारपदाला साजेशी खेळी करत श्रीलंकेचा डावा सावरायचा प्रयत्न केला त्याला चंडीमलची (५९) साथ मिळाली. मात्र ते बाद झाले आणि श्रीलंकेचा डाव १८३ धावांत आटोपला.

श्रीलंकेतर्फे करुणारत्नेने (९), सिल्वा (५), थिरीमने (१३), संगकारा (५), मुबारक (०) मोठी खेळी करण्यास अपयशी ठरले.  

भारताकडून आर अश्विनने सहा बळी घेतले. अमित मिश्राने २, वरूण अॅरॉन व इशांत शर्माने प्रत्येकी १ बळी घेतला.

अश्विनच्या फिरकीची जादू चालल्याने श्रीलंकेचा डाव थोडक्यात आटोपला आणि भारताने पहिल्या दिवशी कसोटीवर पकड मिळवली.

धावफलक :- 

श्रीलंका ४९.४ षटकात सर्वबाद १८३

( अँजलो मॅथ्यूजने ६४, चंडीमलची ५९, हेरथ २३, थिरीमने १३ 

आर अश्विन - १३.४-०२-४६-०६, अमित मिश्रा - ०६-०१-२०-०२ )

भारत ३४ षटकात दोन बाद १२८

शिखर धवन नाबाद ५३, विराट कोहली नाबाद ४५