शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

एसआरएचची दावेदारी भक्कम

By admin | Updated: May 16, 2016 04:18 IST

युवराज सिंगच्या नाबाद ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने (एसआरएच) रंगतदार लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबचा ७ गडी राखून पराभव केला

मोहाली : कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या (५२) अर्धशतकी खेळीनंतर सिक्सर किंग युवराज सिंगच्या नाबाद ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने (एसआरएच) रंगतदार लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबचा ७ गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात प्ले आॅफचा दावा मजबूत केला. पंजाबने हाशिम अमलाच्या (९६) अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४ बाद १७९ धावांची आव्हानात्मक मजल मारली होती, पण युवराजने आक्रमक खेळी करीत हैदराबाद संघाला १९.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. युवराजने २४ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ४२ धावांची खेळी केली. त्यात ३ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे. बेन कटिंगने ११ चेंडूंमध्ये नाबाद २१ धावा फटकावल्या. युवराजने कटिंगसोबत केवळ ३.४ षटकांत चौथ्या विकेटसाठी ४४ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह सनराझर्सने १२ सामन्यांत ८ विजयांसह १६ गुणांची कमाई केली. सनरायझर्स संघ अव्वल स्थानावर असून, त्यांचे प्ले आॅफमध्ये खेळणे जवळजवळ निश्चित झाले अहे. पंजाब संघाच्या खात्यावर १२ सामन्यांत केवळ ८ गुणांची नोंद असून, रायझिंग पुणे सुपरजायन्ट््स संघानंतर प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला हा दुसरा संघ ठरला आहे. त्याआधी, स्टार फलंदाज हाशिम अमलाचे शतक केवळ चार धावांनी हुकले, पण त्याच्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हनने ४ बाद १७९ धावांची दमदार मजल मारली. आयपीएलच्या आपल्या पहिल्याच मोसमात खेळत असलेल्या अमलाने ५६ चेंडूंना सामोरे जाताना १४ चौकार व २ षटकाराच्या मदतीने ९६ धावा फटकावल्या. त्याने गुरकिरत सिंगसोबत (२७) तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची, तर रिद्धिमान साहासोबत (२७) दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. डेव्हिड मिलर (२० धावा, ९ धावा) नाबाद राहिला. पंजाब संघाने अखेरच्या ७ षटकांत ७७ धावा फटकावल्या. हैदराबादतर्फे भुवनेश्वर कुमारने ३२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. मुस्तफिजुर रहमान व मोइजेस हेन्रिक्सने प्रत्येकी एक बळी घेतला. आशिष नेहरा महागडा गोलंदाज ठरला. दुखापतग्रस्त होण्यापूर्वी त्याने २.५ षटकांत ३५ धावा बहाल केल्या. (वृत्तसंस्था)।संक्षिप्त धावफलक किंग्स इलेव्हन पंजाब : हाशिम अमला झे. वॉर्नर गो. भुवनेश्वर ९६, मुरली विजय झे. वॉर्नर गो. मुस्तफिजूर ०६, रिद्धिमान साहा झे. हुड्डा गो. हेनरिक्स २७, गुरकिरत सिंग त्रि. गो. भुवनेश्वर २७, डेव्हिड मिलर नाबाद २०, एकूण २० षटकांत ४ बाद १७९. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-३२-२, मुस्तफिजूर ४-०-३२-१, हेनरिक्स ३-०-२९-१ सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर हिटविकेट गो. अक्षर ५२, शिखर धवन धावबाद २५, दीपक हुड्डा झे. मिलर गो. संदीप ३४, युवराज सिंग नाबाद ४२, बेन कटिंग नाबाद २१. एकूण १९.४ षटकांत ३ बाद १८३. गोलंदाजी : संदीप ४-०-३५-१, अक्षर ४-०-२६-१.