शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

स्क्वॉशने उंची गाठली

By admin | Updated: December 18, 2014 09:13 IST

भारतीय स्क्वॉशसाठी सरते वर्ष हे अभूतपूर्व उंची गाठणारे ठरले. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक नोंद केली.

भारतीय स्क्वॉशसाठी सरते वर्ष हे अभूतपूर्व उंची गाठणारे ठरले. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक नोंद केली. दीपिका पल्लीकल, जोशना चिनप्पा आणि सौरव घोषाल यांनी कामगिरीत सातत्य राखून पदकांची लयलूट केली असली तरी हरिंदर पाल संधू याच्याच नावाचा बोलबाला राहिला. राष्ट्रकुल स्पर्धेत दीपिका आणि जोशना या जोडीने महिला सांघिक गटात सुवर्ण जिंकले. आशियाई स्पर्धेत पदकांमध्ये वाढ झाली. सौरव घोषाल, कुश कुमार, महेश माणगावकर व हरिंदर पाल संधू या चौकडीने पुरुष सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले, तर पुरुष एकेरी सौरव आणि महिला सांघिक गटात भारताला रौप्य पटकावण्यात यश आले. महिला एकेरी दीपिकाला कांस्यवर समाधान मानावे लागले.भारताने आशियाई स्पर्धेत चारही गटांत पदकांची लयलूट केली. हे वर्ष राष्ट्रकुल स्पर्धेला समर्पित करत असल्याची प्रतिक्रीया घोषालने दिली. महिला गटात दीपिका, चिनप्पा आणि अनाका अलांकामोनी यांनी भारताला पहिला रौप्य पदक जिंकवून दिला. जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावर झेप घेणाऱ्या दीपिकाने उपांत्यपूर्व फेरीत चिनप्पाचा पराभव करून कांस्यपदकही पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत या जोडीने भारताला पहिले पदक आणि तेही सुवर्ण पटकावून दिले.