क्रीडा ...
By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST
एनटीसीपी संघाचे सलग विजय
क्रीडा ...
एनटीसीपी संघाचे सलग विजयआंतर महाविद्यालय सॉफ्टबॉल स्पर्धानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या यजमानपदाखाली शुक्रवारपासून प्रारंभ झालेल्या आंतर महाविद्यालय सॉफ्टबॉल स्पर्धेत एनटीसीपी संघांनी सलग विजयाची नोंद केली. धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतींमध्ये एनटीसीपी संघाने सुरुवातीला आभा गायकवाड पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ६-० ने पराभव केला. त्यानंतर एनटीपीसी संघाने एमबी पटेल महाविद्यालयावर १३-० ने सहज विजय नोंदविला. त्याआधी, आरडीएसएसएम संघाने बीडी अभियांत्रिकी महाविद्यालय वर्धा संघाची झुंज ३-२ ने मोडून काढली. मुलींच्या विभागात मॉरिस कॉलेजने नूतन आदर्श महाविद्यालयाचा ७-१ ने तर एम.बी. पटेल महाविद्यालय साकोली संघाने एमआयटी संघाचा ७-० ने पराभव केला. अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाने एमबी पटेल साकोली संघावर ६-१ ने सरशी साधली. त्याआधी, डॉ. देवेंद्र बुरघाटे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. विकास येवतिकर, प्रा. देशपांडे, प्रा. सुभाष दाढे, प्रा. मनीष देशमुख आदी उपस्थित होते. डॉ. देवेंद्र वानखेडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. (क्रीडा प्रतिनिधी)