शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

क्रीडा रणजी

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

तमिळनाडूची उपांत्य फेरीत धडकरणजी करंडक क्रिकेट : विदर्भ पराभव टाळण्यात यशस्वीजयपूर : तमिळनाडूने शुक्रवारी विदर्भाविरुद्ध अनिर्णीत संपलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या डावातील १४४ धावांच्या आघाडीच्या आधारावर रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तमिळनाडू संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. विदर्भाला अखेरच्या दिवशी विजयासाठी ४११ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा ...


तमिळनाडूची उपांत्य फेरीत धडक
रणजी करंडक क्रिकेट : विदर्भ पराभव टाळण्यात यशस्वी
जयपूर : तमिळनाडूने शुक्रवारी विदर्भाविरुद्ध अनिर्णीत संपलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या डावातील १४४ धावांच्या आघाडीच्या आधारावर रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तमिळनाडू संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. विदर्भाला अखेरच्या दिवशी विजयासाठी ४११ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाची ८ बाद १४२ अशी अवस्था असताना उभय कर्णधारांनी सामना अनिर्णीत संपल्याचे मान्य केले. तमिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत संपुष्टात आला. तमिळनाडूने पहिल्या डावात १४४ धावांची मिळविलेली आघाडी अखेर निर्णायक ठरली.
कालच्या ६ बाद १९३ धावसंख्येवरून पुढे खेळताना तमिळनाडूचा दुसरा डाव आज शेवटच्या दिवशी २६६ धावांत संपुष्टात आला. विदर्भातर्फे स्वप्नील बंडीवारने ४२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. रविकुमार ठाकूर व राकेश ध्रुव यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. ४११ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाची ४ बाद ६८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर गणेश सतीशने (नाबाद ५९) अर्धशतकी खेळी करीत विदर्भाचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ६ चौकारांचा समावेश आहे. शलभ श्रीवास्तव (३३) आणि राकेश ध्रुव (२२) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. तमिळनाडूतर्फे बाबा अपराजितने ४१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. प्रशांत परमेश्वरनने २; तर लक्ष्मीपती बालाजी व मालोलन रंगराजन यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी परतवले.
(वृत्तसंस्था)