शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्टस् फोटोग्राफीच झाले आयुष्य

By admin | Updated: August 12, 2016 00:50 IST

दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात आवड म्हणून सुरू झालेल्या फोटोग्राफीचा प्रवास खेळाच्या मैदानापर्यंत आला. खेळातील महत्त्वाचे क्षण टिपताना खेळाडूंच्या भावमुद्राही टिपून वेगळेपण

रिओ : दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात आवड म्हणून सुरू झालेल्या फोटोग्राफीचा प्रवास खेळाच्या मैदानापर्यंत आला. खेळातील महत्त्वाचे क्षण टिपताना खेळाडूंच्या भावमुद्राही टिपून वेगळेपण सिध्द करणारी एक ५७ वर्षीय महिला आॅलिम्पिकच्या मैदानावरचं नाट्य टिपत आहे. सोमवारी पहाटेपासूनच पाऊस सुरू होता. जीतु रायची महत्त्वाची स्पर्धा पाहण्यासाठी बसने जात होतो. यावेळी कॅमेऱ्याची मोठी ब्रिफकेस, स्टॅँड असा सर्व लवाजमा असलेली एक महिला दिसली. तिला थोडी बॅग उचलण्यासाठी मदत करून बसायला जागा दिल्यानंतर बोलायला सुरुवात झाली अन् दक्षिण अफ्रिकेच्या अ‍ॅना लॉर्इंग यांचा सगळा प्रवास उलगडत गेला. ५७ व्या वर्षीही तरुणांना लाजेल अशा उत्साहात मैदानावर वावरण्यामागची जिद्द त्यांनी सांगितली. अ‍ॅना म्हणाल्या, ‘‘दक्षिण आफ्रिकेतील पिचेरीया गावात मी राहात होते. आमच्या गावात शहरातील एका शाळेची सहल आली होती. त्या मुलांकडे मी कॅमेरा पाहिला आणि मला मोठे कुतुहल वाटले, याच्या साहाय्याने फोटो काढले जातात. त्यामुळे मला सुध्दा लहानपणापासून फोटोग्राफीचा छंद होता. जसजशी मोठी होते गेले तसतशी माझी आवड वाढत गेली. साधा कॅमेरा घेऊन जंगलात फोटो काढायला जाऊ लागले. शिक्षणासाठी भावाकडे येऊन केपटाऊनमध्ये विधी शाखेत प्रवेश घेऊन अभ्यास सुरू केला. यावेळी उदारनिर्वाहासाठी केप टाइम्स वृत्तपत्र विकत होते. त्यातील फोटो दररोज पाहायचे आणि आपणही फोटोग्राफी करावी असे वाटू लागले. यासाठी एक कॅमेरा घेतला आणि क्रिकेट, रग्बी, फुटबॉल मैदानावर भटकू लागले. एके दिवशी केप टाइम्सचा फोटोग्राफर आजारी पडला. मी मैदानावर जाऊन फोटो काढले आणि सरळ आॅफिसला जाऊन दिले. संपादकांनी ते पाहिले आणि थक्कच झाले. येथूनच माझ्या फोटोग्राफीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. ’’ (विशेष प्रतिनिधी)