शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयने घेतली क्रीडा मंत्रालयाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 04:07 IST

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंच्या डोपिंग चाचणीप्रकरणी सध्या मोठा वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्याशी चर्चा केली.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंच्या डोपिंग चाचणीप्रकरणी सध्या मोठा वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी, पाकविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसंबंधी सरकारचे मतही जाणून घेतले. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था (नाडा) भारतीय क्रिकेटपटूंची डोपिंग चाचणी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, बीसीसीआयने ‘नाडा’ची मागणी फेटाळून लावली. जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेप्रमाणेच (वाडा) आमच्याकडे संघटना असल्याने आम्हाला ‘नाडा’अंतर्गत चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेची विशेष बैठक ९ डिसेंबरला होणार असून या सभेच्या अजेंड्यामध्ये ‘नाडा’चा विषयही जोडण्यात आला आहे. बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक (प्रशासन आणि खेळ विकास) प्रो. रत्नाकर शेट्टी यांनी बुधवारी राठोड यांच्या कार्यालयामध्ये सुमारे ४५ मिनिटांची चर्चा केली. या वेळी काही अन्य विषयांवरही चर्चा झाली, परंतु मुख्य विषय डोपिंग चाचणीचा होता.बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले की, ‘आजच्या चर्चेचा मुख्य विषय ‘नाडा’ आणि ‘वाडा’ होता. राहुल जोहरी यांच्यासोबर रत्नाकर शेट्टी जाणार असल्याचे आधीच ठरले होते, कारण त्यांना बीसीसीआयच्या डोपिंग प्रक्रीयेची माहिती आहे. ’दरम्यान, आगामी एसजीएममध्ये क्रीडा मंत्रालयाचे मत बीसीसीआय अधिकाºयांपुढे मांडण्यात येतील. तसेच, डोपिंग विरोधी मुद्याचा समावेश अजेंडामध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी दिली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BCCIबीसीसीआयCricketक्रिकेट