शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा मंत्रालयाची एसएसपीएफला मान्यता

By admin | Updated: January 8, 2017 03:57 IST

क्रीडा मंत्रालयाने स्कूल स्पोर्टस् प्रमोशन फाऊंडेशनला (एसएसपीएफ) मान्यता दिली आहे. पहिल्या वर्षी केलेल्या शानदार प्रदर्शनामुळे खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय खेळ संवर्धन

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने स्कूल स्पोर्टस् प्रमोशन फाऊंडेशनला (एसएसपीएफ) मान्यता दिली आहे. पहिल्या वर्षी केलेल्या शानदार प्रदर्शनामुळे खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय खेळ संवर्धन संघटनेच्या रुपात सरकाने ही मान्यता दिली आहे. एसएसपीएफचे चेअरमन ओम पाठक यांनी आज ही माहिती दिली. ‘‘ ते म्हणाले ही अशी पहिली स्वतंत्र संस्था आहे. ज्याला सरकारने मान्यता दिली आहे. आम्ही मागच्या वर्षात क्रिकेट आणि फुटबॉलने सुरूवात केली होती. मात्र आता मान्यता मिळाल्याने मोठ्या ताकतीने आम्ही पुढे जाऊ. या वर्षी फुटबॉल आणि क्रिकेट सोबतच अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल या खेळांना मान्यता दिली जाईल. ’’पाठक यांनी सांगितले की,‘‘ गेल्या वर्षी २ ० राज्यातील १२०० शाळांच्या संघांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. यावर्षी २५ राज्यात ३०० जिल्ह्यात १० हजार शाळांच्या संघांना सहभागी करून घेण्याचे फाउंडेशनचे लक्ष्य आहे.’’ते पुढे म्हणाले,‘‘ या वर्षी जवळपास दोन लाख शाळकरी खेळाडू यात सहभागी होतील आणि सुमारे १६ हजार सामने खेळवले जातील. ’’ एसएसपीएफने विविध खेळांसाठी माजी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चेअरमन म्हणून नियुक्त देखील केले आहे. चेतन शर्मा (क्रिकेट), बायचूंग भूतिया (फुटबॉल), जी.एस.रंधावा (अ‍ॅथलेटिक्स), ओमप्रकाश (व्हॉलिबॉल), हनुमान सिंह - (बास्केटबॉल) यांचा यात समावेश आहे.