शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

क्रीडा लोकल जोड

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

राज्य शालेय बॉस्केटबॉल स्पर्धा

राज्य शालेय बॉस्केटबॉल स्पर्धा
आठ विभागाच्या संघांचा सहभाग
नागपूर : नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेला उद्या, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत आठ विभागीय स्पर्धेतील विजेते संघ सहभागी होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी दिली.
तीन दिवस १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलामुलींच्या गटात होणाऱ्या स्पर्धेतील सामने शिवाजीनगर जिमखाना आणि अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बास्केटबॉल कोर्टवर होणार आहेत. स्पर्धेत नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे, मुंबई, नाशिक व कोल्हापूर या विभागातील संघ सहभागी होणार आहेत. सोमवारी सकाळी अंतिम सामने होणार असून सायंकाळी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणी होणार आहे. स्पर्धेसाठी शिवाजीनगर जिमखानाचे दोन आणि रातुम नागपूर विद्यापीठाचे दोन कोर्ट सज्ज आहेत. स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींमध्ये त्रिमूर्तीनगर येथील भवन्स स्कूल, मुलांमध्ये काटोल रोड येथील सेंटर पॉईंट स्कूल, १७ वर्षांखालील मुलामुलींमध्ये काटोल रोड येथील सेंटर पॉईंट स्कूल आणि १९ वर्षांखालील मुलींमध्ये एलएडी महाविद्यालय व मुलांमध्ये सिव्हिल लाईन्स येथील भवन्स स्कूल नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शिवाजीनगर जिमखानाच्या मैदानावर रविवारी ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या अध्यक्षा खासदार पुनम महाजन उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही विजय संतान यांनी दिली. पत्रकार परिषदेला नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव शत्रुघ्न गोखले, प्रणय घाटे, समीर श्रीवास्तव उपस्थित होते.
--------------------------------