शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

क्रीडा लोकल

By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST

राजामाता जिजाऊ व बाबा हरदास संघांना जेतेपद

राजामाता जिजाऊ व बाबा हरदास संघांना जेतेपद
महापौर चषक कबड्डी स्पर्धा : स्नेहल शिंदे, पवनकुमार ठरले मालिकावीर
नागपूर : महिला विभागात राजमाता जिजाऊ संघ (पुणे) आणि पुरुष गटात बाबा हरदास क्लब (हरियाणा) संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत नागपूर महानगरपालिकेतर्फे रविवारी संपलेल्या महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत आपापल्या गटात जेतेपदाचा मान मिळविला. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणारी राजमाता जिजाऊ संघाची स्नेहल शिंदे आणि पुरुष गटात बाबा हरदास क्लबचा पवनकुमार मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. रा. पै. समर्थ स्टेडियममध्ये (चिटणीस पार्क) येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महिला गटातील अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने अंकिता जगताप व स्नेहल शिंदेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दक्षिण पूर्व रेल्वेचा (कोलकाता) २६-१४ ने पराभव करीत जेतेपदाचा मान मिळविला. राजमाता जिजाऊ संघाने दोन गुणांची आघाडी घेतली होती. दक्षिण पूर्व रेल्वेच्या पिंकी रामोले व रिना पटेल यांनी संघर्षपूर्ण खेळ केला. त्याआधी, उपांत्य सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने भिवानी येथील हरियाणा स्टेट संघाचा ५३-२२ ने पराभव केला. मध्यंतरापर्यंत राजमाता जिजाऊ संघाने २२-१४ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या उपांत्य लढतीत दक्षिण पूर्व रेल्वेने एनसीपीई (नोएडा) संघाचा २४-१९ ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. मध्यंतरापर्यंत दक्षिण पूर्व रेल्वेने १०-६ अशी आघाडी घेतली होती.
पुरुष गटात अंतिम लढतीत हरियाणाच्या बाबा हरदास क्लबने दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेला (बिलासपूर) २६-२२ ने नमवित विजेतेपद पटकावले. प्रीतम सिंगच्या चमकदार खेळाच्या जोरावर दपूम रेल्वेने मध्यंतरापर्यंत १५-१२ अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर बाबा हरदास क्लबच्या विनोदकुमार व पवनकुमारने दमदार खेळ करीत विजय खेचून आणला. त्याआधी, उपांत्यपूर्व सामन्यात बाबा हरदास क्लबने नागपूर ग्रामीण पोलीस संघाचा २३-६ ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दपूम रेल्वेने मुंबईच्या मध्य रेल्वेचा १९-९ ने पराभव केला. (क्रीडा प्रतिनिधी)