शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेळांचा गेम - भारतीय व महाराष्ट्र आॅलिंपिक असोसिएशन मान्यता, देशात ४०, तर महाराष्ट्रात ३१ संघटना संलग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 03:43 IST

सद्यस्थितीत भारतीय आॅलिंपिक असोसिएशनशी देशातील ४० संघटना संलग्न असून, महाराष्ट्र आॅलिंपिक संघटनेशी फक्त ३१ संघटना संलग्न आहेत.

नवनाथ खराडेअहमदनगर : सद्यस्थितीत भारतीय आॅलिंपिक असोसिएशनशी देशातील ४० संघटना संलग्न असून, महाराष्ट्र आॅलिंपिक संघटनेशी फक्त ३१ संघटना संलग्न आहेत. मात्र या संघटनांच्या नावात कुठेही आॅलिंपिक, रूरल, वूमन आॅलिंपिक अशा शब्दांचा समावेश नाही. कारण त्यांना नावात आॅलिंपिक शब्दाचा वापरच करता येत नाही. अनधिकृत संघटना मात्र बिनधास्त हा शब्द वापरत धूळफेक करतात.सद्यस्थितीत शालेय क्रीडा स्पर्धेत ४२ खेळप्रकारांचा समावेश आहे. भारतीय आॅलिंपिक संघाकडे ४० खेळांचे प्रकार आहेत. तर आॅलिंपिकमध्ये सद्यस्थितीत ५७ खेळांचा समावेश आहे. त्यामुळे अधिकृत खेळांची वर्गवारी करून सवलती व सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. याव्यतिरिक्तचे खेळ धंद म्हणून खेळण्यास हरकत नाही.भारतीय आॅलिंपिक असोसिएशनशी संलग्न संघटनाआर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बिलियर्ड्स अँड स्कूनर, बॉलिंग, बॉक्सिंग, सायकलिंग, घोडेस्वारी, फेन्सिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कयाकिंग आणि कनोइंग, खो-खो, नेटबॉल, रोइंग, रग्बी, शूटिंग, स्क्वॅश, स्विमिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, विंटर गेम्स, रेसलिंग, वुशू, नौकाविहार, गोल्फ, आईस हॉकी, आईस स्केंटिग, ल्यूज, मॉडर्न पेन्थालॉन, कराटे. या संघटनांच्या नावात असोसिएशन किंवा ‘असोसिएशन आॅफ इंडिया’ असा उल्लेख असतो. यातील ३१ संघटना महाराष्ट्र असोसिएशनशी संलग्न आहेत. या संघटनांच्या नावात असोसिएशन किंवा ‘असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’ अशाच नावाचा उल्लेख आहे.नोकरीत आरक्षणनोकरीतही खेळाडूंना आरक्षण देण्यात येते. राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदक, कांस्यपदक व ब्राँझपदक विजेत्यास वर्ग ३ व वर्ग ४ मध्ये ५ टक्के आरक्षण असते. तर राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक, कांस्यपदक व ब्राँझपदक विजेत्यास वर्ग १ व वर्ग २ साठी आरक्षण मिळते. मात्र, अधिकृत संघटना किंवा क्रीडा विभाग आयोजित स्पर्धांमधल्या खेळाडूंनाच हा लाभ मिळतो.शालेय ४२ स्पर्धाशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये ४२ खेळांचा समावेश आहे. त्यामध्ये धनुर्विद्या, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, टेनिस, शूटिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, बुद्धिबळ, सायकलिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, ज्युदो, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, तायक्वांदो, जलतरण व डायव्हिंग, वॉटरपोलो, कबड्डी, स्क्वॅश, वुशू, तलवारबाजी, हॅण्डबॉल, खो-खो, बॉलबॅडमिंटन, कॅरम, नेटबॉल, सॉफ्टबॉल, रोलबॉल, कराटे, शूटिंगबॉल, स्केटिंग, रोलर हॉकी, क्रिकेट, किक बॉक्सिंग, मल्लखांब, योगा, डॉजबॉल, स्क्वॉय मार्शल आर्ट, थ्रोबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.या संघटनेच्या स्पर्र्धा व शालेय क्रीडास्पर्धेतील राज्यस्तरीय व राष्ट्रीयपातळीवरील खेळाडूंना सरकारकडून सवलती दिल्या जातात.सवलतीचे २५ गुणदहावी व बारावीच्या विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात.हे गुण देण्यासाठी भारतीय आॅलिंपिक व महाराष्ट्र आॅलिंपिक असोसिएशनशी संलग्नता असणाºया संघटनांनी आयोजित केलेल्या स्पर्धाच ग्राह्य धरल्या जातात.इतर संघटनांनी आयोजित केलेल्या खेळातील खेळाडूंना गुण देण्यात येत नाहीत.

टॅग्स :Sportsक्रीडा