क्रीडा बॅडमिंटन
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
पहिल्या गेममध्ये मलेशियन खेळाडूने आक्रमक खेळ करीत २१-१७ ने बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये मलेशियन खेळाडूला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्याचा लाभ घेत श्रीकांतने २१-१२ ने गेम जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा गेम सुरू झाल्यानंतर चोंगला स्नायूच्या दुखापतीने सतावले. त्यामुळे त्याला या लढतीतून माघार घ्यावी लागली.
क्रीडा बॅडमिंटन
पहिल्या गेममध्ये मलेशियन खेळाडूने आक्रमक खेळ करीत २१-१७ ने बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये मलेशियन खेळाडूला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्याचा लाभ घेत श्रीकांतने २१-१२ ने गेम जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा गेम सुरू झाल्यानंतर चोंगला स्नायूच्या दुखापतीने सतावले. त्यामुळे त्याला या लढतीतून माघार घ्यावी लागली. पुरुष एकेरीमध्ये दुसरे मानांकन प्राप्त डेन्मार्कच्या व्हिक्टर एलेक्सेनने सहाव्या मानांकित भारताच्या बी. साई प्रणितची झुंज १५-२१, २१-१७, २१-१६ ने मोडून काढली. तिसऱ्या मानांकित पी. कश्यपने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सिंगापूरच्या ली जियांग डेरेक वोंगचा २१-१८, २१-९ ने पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. (वृत्तसंस्था)