शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
4
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
5
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
6
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
7
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
8
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
9
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
10
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
11
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
12
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
13
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
14
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
15
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
16
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
17
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
18
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
19
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
20
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

क्रीडामंत्र्यांनाच कळेना खेळाडूंच्या फोटो आणि नावातील फरक !

By admin | Updated: August 15, 2016 21:56 IST

विजय गोयल यांनी एथलेटिक्समध्ये 200 मीटर महिला शर्यतीच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्बानी नंदा हिला शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या टिवटमध्ये चक्क दुती चंद हिचा फोटो लावून तो टि्वटवर शेअर केला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - राजकारणी आणि बॉलिवूडकरांनी खेळाडूंच्या नावाची वाट लावणं काही नवीन नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच सलमान खानला भारताची पहिली महिला जिम्नॅस्टिक दीपा कर्माकर हिचं नावच आठवत नव्हतं. त्यावेळी त्यानं दीपाचं नाव चुकीच्या पद्धतीनं उच्चारलं होतं. तेव्हाही त्याचावर टीका झाली होती. मात्र सलमानच्याच पावलावर पाऊल ठेवून ही घोडचूक चक्क केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केली आहे.
 
विजय गोयल यांनी एथलेटिक्समध्ये 200 मीटर महिला शर्यतीच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्बानी नंदा हिला शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या टि्वटमध्ये चक्क दुती चंद हिचा फोटो लावून तो टि्वटरवर शेअर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी ते फोटो असलेलं टि्वट चक्क टि्वटरवरून काढून टाकलं.
 
या प्रकारामुळे विजय गोयल यांनी स्वतःच्या अकलेचे तारे टि्वटरच्या माध्यमातून तोडल्याची तीव्र प्रतिक्रिया टि्वटरकरांमध्ये उमटली आहे. ही चूक विजय गोयल यांनी पहिल्यांदाच केली नाही. याआधी त्यांनी दीपा कर्माकर हिच्या नावाचा दीपा करमानकर असा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांच्यावर खूप टीका झाली होती.