क्रीडा आफ्रिका
By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST
अमला, वान जिलची चमक
क्रीडा आफ्रिका
अमला, वान जिलची चमकदक्षिण आफ्रिकेची दमदार मजलसेंचुरियन : हाशिम अमलाचे विक्रमी द्विशतक आणि स्टियान वान जिलची पदार्पणाच्या कसोटीत नाबाद शतकी खेळी याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशी पहिला डाव ५ बाद ५५२ धावसंख्येवर घोषित केला. अमलाने (२०८) कारकीर्दीतील तिसरे द्विशतक झळकाविले. मायदेशात द्विशतकी खेळी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला कर्णधार ठरला. त्याने एबी डिव्हिलियर्ससोबत (१५२) चौथ्या विकेटसाठी ३०८ धावांची विक्रमी भागीदारी केली. वान जिलने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकाविले. अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पाचवा फलंदाज ठरला. वान जिलने शतक पूर्ण केल्यानंतर कर्णधार अमलाने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची पहिल्या दिवशी सुरुवातीला ३ बाद ५७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर अमला व डिव्हिलियर्स यांनी विंडीजच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. त्यांनी आज ३ बाद ३४० धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. डिव्हिलियर्सला वैयक्तिक धावसंख्येत आज केवळ ११ धावांची भर घालता आली. फिरकीपटू सुलेमान बेनने डिव्हिलियर्सला तंबूचा मार्ग दाखविला. डिव्हिलियर्सने २३५ चेंडूंना सामोरे जाताना १६ चौकार २ षटकार ठोकले. अमला वैयक्तिक तिसरे तर दक्षिण आफ्रिकेतील पहिले द्विशत झळकाविण्यात यशस्वी ठरला. त्याला वान जिलने योग्य साथ दिली. अमला व जिल यांनी पाचव्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. बेनने अमलाची मॅरेथॉन खेळी संपवली. अमलाच्या द्विशतकी खेळीत २२ चौकारांचा समावेश आहे. जिलने पदार्पणाच्या कसोटीत शतकी खेळी करताना ॲण्ड्य्रू हडसन, जॅक रुडोल्फ, ॲल्विरो पीटरसन व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या यादीत स्थान मिळविले. जिलने १३० चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकार लगाविले. यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डिकाक १८ धावा काढून नाबाद राहिला. त्यात २ षटकारांचा समावेश आहे. विंडीजतर्फे केमार रोच व सुलेमान बेन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)