स्पोर्ट पेज: महाराष्ट्र चॉकबॉल संघ राष्ट्रीय स्पर्धेकरिता रवाना
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST
अकोला: विजयवाडा (सीमांध्रा) येथे १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत होणार्या सातव्या ज्युनिअर राष्ट्रीय चॉकबॉल अजिंक्यपद स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी अकोला येथून रवाना झाला.
स्पोर्ट पेज: महाराष्ट्र चॉकबॉल संघ राष्ट्रीय स्पर्धेकरिता रवाना
अकोला: विजयवाडा (सीमांध्रा) येथे १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत होणार्या सातव्या ज्युनिअर राष्ट्रीय चॉकबॉल अजिंक्यपद स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी अकोला येथून रवाना झाला.महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत अकोला येथील वसंत देसाई क्रीडांगण येथे घेण्यात आले. प्रशिक्षक नारायण बत्तुले यांच्या मार्गदर्शनात शिबिर घेण्यात आले. महाराष्ट्र संघात विवेक बांगर, अभिजित पाटील कोल्हापूर, प्रसाद जाधव सोलापूर, मोहित पिंपळे, कृष्णा अंभारे अकोला, गौरव राणा जळगाव, कुणाल जिचकार अमरावती, शुभम अभंग, कार्तिक नाफडे, प्रकाश खर्चे बुलडाणा, विजय भोसले सातारा, प्रथमेश पवार पुणे, संघप्रशिक्षक सुशांत माने कोल्हापूर, व्यवस्थापक मुकुल देशपांडे अकोला. मुलींच्या संघात ऋचा नमुले, कीर्ती अमिन मुंबई उपनगर, मिष्का कदम पुणे, गायत्री गलांडे, शुभांगी नेमाडे अकोला, शीतल तायडे, श्रद्धा बोदडे, पायल नाफडे बुलडाणा, प्रणिता जाधव सातारा, प्रशिक्षक उदय जाधव सातारा, व्यवस्थापक नूपुर देशपांडे अकोला यांचा समावेश आहे. (क्रीडा प्रतिनिधी)...