स्पोर्ट: रुस्तमाबाद येथे जिल्हा स्तर कबड्डी स्पर्धा
By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST
अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुस्तमाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन रुस्तमाबाद येथे केले आहे.
स्पोर्ट: रुस्तमाबाद येथे जिल्हा स्तर कबड्डी स्पर्धा
अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुस्तमाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन रुस्तमाबाद येथे केले आहे.१४, १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिरकड यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे वासुदेव नेरकर, सरपंच सुनंदा पिंपळकार उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण कार्यक्रम १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिरकड राहतील. बक्षीस वितरण पं.स. सदस्य मंगेश काळे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून गजानन म्हैसने, ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष डिगांबर म्हैसने उपस्थित राहतील. या स्पर्धेनिमित्त जिल्हा क्रीडा पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक संजय मैंद यांनी सांगितले.(क्रीडा प्रतिनिधी)...