स्पोर्ट: बीकेव्हीचे बॉक्सर ऋषिकेश व अजय राज्य स्तरावर
By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST
अकोला : अमरावती विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत जुने शहरातील भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या (बीकेव्ही) ऋषिकेश फंदाट व अजय आसेरी या बॉक्सरांनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत राज्य स्तर स्पर्धेत स्थान निश्चित केले. राज्य स्तर स्पर्धा पुढील महिन्यात चंद्रप्ूुर येथे होणार आहे.
स्पोर्ट: बीकेव्हीचे बॉक्सर ऋषिकेश व अजय राज्य स्तरावर
अकोला : अमरावती विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत जुने शहरातील भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या (बीकेव्ही) ऋषिकेश फंदाट व अजय आसेरी या बॉक्सरांनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत राज्य स्तर स्पर्धेत स्थान निश्चित केले. राज्य स्तर स्पर्धा पुढील महिन्यात चंद्रप्ूुर येथे होणार आहे.१७ वर्षाआतील गटात ऋषिकेश व अजय यांनी याआधी राज्य स्तर स्पर्धेत अकोला जिल्ाचे प्रतिनिधित्व करीत पदकांची कमाई केली आहे. विभागीय स्पर्धेत अमन शर्मा, अभिजित लांडे, संकेत अंबर्ते, महेश तायडे, गणेश केदार, प्रतीक शिरसाट, पवन रायबोले यांनी द्वितीयस्थान मिळविले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक राजेश कुळकर्णी, प्रभूदास बावणे, मंगला भोपळे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड़ दादासाहेब देशपांडे, उपाध्यक्ष मदनलाल खंडेलवाल, शांतीलाल खंडेलवाल, सचिव गोपाल खंडेलवाल, डॉ. तारा हातवळणे, मुख्याध्यापक जगदीश राजवैद्य, उपमुख्याध्यापिका रेखा येळणे, दिनकर इंगळे, शांताराम धोत्रे यांनी खेळाडूंचे कौतुक केले.(क्रीडा प्रतिनिधी)फोटोकॅप्शन: बॉक्सर ऋषिकेश फंदाट व अजय आसेरी मार्गदर्शकांसोबत.-१२सीटीसीएल१५...