शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

फिरकी गोलंदाजी निर्णायक ठरेल

By admin | Updated: March 17, 2016 01:24 IST

आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली. न्यूझीलंड संघात झुंजार वृत्ती आहे, हे ध्यानात घेतले तरी धोनी अ‍ॅन्ड कंपनीकडून अशा प्रकारच्या पराभवाची अपेक्षा नव्हती.

- सौरव गांगुली लिहितो़..आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली. न्यूझीलंड संघात झुंजार वृत्ती आहे, हे ध्यानात घेतले तरी धोनी अ‍ॅन्ड कंपनीकडून अशा प्रकारच्या पराभवाची अपेक्षा नव्हती. नागपूरच्या खेळपट्टीने भारताची चांगलीच ‘फिरकी’ घेतली. मीदेखील नागपुरात बरेच क्रिकेट खेळलो. या खेळपट्टीबाबत टीम इंडिया नव्हे, तर मलादेखील आश्चर्याचा धक्का बसला. खेळपट्टी टर्न घेते, पण किती टर्न व्हावी. क्युरेटरनेदेखील याची कल्पना केली नसावी. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग खरोखर कठीण होता.या खेळपट्टीवरील भारताची फलंदाजी चर्चेचा विषय असेलही, पण न्यूझीलंडलादेखील श्रेय दिले पाहिजे. हा संघ चांगलाच खेळला व समतोल संघ आहे. फलंदाजी फळीत कॉलीन मुन्रो, मार्टिन गुप्टिल, कोरी अँडरसन, रॉस टेलर केन विल्यम्सन आणि ग्रँट इलियट हे चांगल्या धावा काढू शकतात. चेंडूवर नियंत्रण मिळविणारे चांगले फिरकी गोलंदाज संघात आहेत. भारतीय उपखंडात व विश्वचषकात फिरकी महत्त्वाची भूमिका बजावेल. न्यूझीलंडने याची झलक दिली. नाथन मॅक्युलम, ईश सोधी आणि मिशेल सेन्टनर हे स्पर्धेत प्रत्येक सामन्यात मोलाची भूमिका बजावू शकतात. न्यूझीलंडच्या निवडकर्त्यांनी हे हेरले असावे. त्यामुळे भारताविरुद्ध तिघांनाही संधी दिली. परिस्थितीचा त्यांनी चांगला वेध घेतलेला दिसतो. या बळावर भारतावर सलग पाचवा टी-२० विजय नोंदविण्यात यश आले.विश्वचषकाची सुरुवात पराभवाने झाल्यानंतर अंतिम चार संघांत स्थान मिळविण्यासाठी भारताला आता प्रत्येक सामना जिंकण्याचे आव्हान असेल. इडन आणि मोहालीतील खेळपट्ट्यांवर मोठ्या खेळी करीत अनुभवी भारतीयांना उपांत्य फेरी गाठता येईल. पण त्यासाठी फटका मारण्यापूर्वी चेंडूचा वेध घेणे गरजेचे राहील. टी-२० ला हवी असलेली फलंदाजी विजयाचा आनंद मिळवून देते हेदेखील खरे.(गेमप्लान)