शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केदारविरुद्ध विशेष योजना

By admin | Updated: March 15, 2017 01:13 IST

महाराष्ट्राचा संघ चांगला असून त्यांच्याविरुद्ध अटीतटीची लढत होईल. त्यांचा स्टार फलंदाज केदार जाधव सध्या फॉर्ममध्ये असून त्याच्याविरुद्ध विशेष योजना

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा संघ चांगला असून त्यांच्याविरुद्ध अटीतटीची लढत होईल. त्यांचा स्टार फलंदाज केदार जाधव सध्या फॉर्ममध्ये असून त्याच्याविरुद्ध विशेष योजना आम्ही आखल्या आहेत, अशी माहिती पश्चिम बंगालचा कर्णधार मनोज तिवारी याने दिली.बुधवारी विजय हजारे चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगाल महाराष्ट्रविरुद्ध भिडेल. या सामन्याआधी तिवारीने आपली प्रतिक्रिया दिली. भारताकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमक दाखवलेला केदार इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच, महाराष्ट्राच्या कर्णधाराला रोखण्यासाठी पश्चिम बंगाल कोणतीही कसर ठेवणार नाही. तिवारीने म्हटले, ‘‘केदार मॅचविनर असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय तो प्रतिस्पर्धी संघातील सर्वात धोकादायक फलंदाज आहे, यावर कोणतेही दुमत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवान गोलंदाज मारा करीत असताना त्याला बाद करणे आवश्यक आहे. डावाच्या सुरुवातीला तो अडखळतो आणि आम्हाला याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे.’’ त्याचप्रमाणे, ‘‘आम्ही ५ प्रमुख गोलंदाजांसह खेळणार असून मी, प्रग्यान ओझा आणि आमिर गनी या आमच्या फिरकी जोडीला केदारला गोलंदाजी करताना लेंथ तपासण्याबाबत सूचना दिली आहे. त्याला स्वीप फटका खेळण्याची संधी न देण्याबाबतही सांगितले आहे.’’ तिवारी म्हणाला, ‘‘केदार पारंपरिक आणि रिव्हर्स स्वीप खूप चांगल्या प्रकारे खेळतो. त्यामुळे या फटक्यांपासून त्याला रोखणे गरजेचे आहे. शिवाय महाराष्ट्र संघाकडे आतापर्यंत ४०१ धावा काढलेला युवा फलंदाज ॠतुराज गायकवाडही आहे.’’ (वृत्तसंस्था)