शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

दक्षिण आफ्रिकेचा दिमाखदार विजय

By admin | Updated: March 3, 2015 23:42 IST

क्षिण आफ्रिकेने विश्वकप क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी ‘ब’ गटात खेळल्या गेलेल्या लढतीत ‘जायंट किलर’ आयर्लंडचा २०१ धावांनी पराभव केला.

कॅनबेरा : सूर गवसलेला सलामीवीर हाशिम आमला व फॅफ ड्युप्लेसिस यांच्या वैयक्तिक आक्रमक शतकी खेळीनंतर केली एबोटच्या अचूक माऱ्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विश्वकप क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी ‘ब’ गटात खेळल्या गेलेल्या लढतीत ‘जायंट किलर’ आयर्लंडचा २०१ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने ४ बाद ४११ धावांची मजल मारली. विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात खेळताना आयर्लंड संघाचा डाव ४५ षटकांत २१० धावांत संपुष्टात आला. पहिल्या सामन्यांत विंडीजविरुद्ध सनसनाटी विजय मिळविणाऱ्या आयर्लंडतर्फे अ‍ॅण्डी बालबनीने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. केव्हिन ओब्रायनने ४८ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेतर्फे एबोटने ८ षटकांत २१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. मोर्नी मोर्कलने ३, तर डेल स्टेनने २ बळी घेऊन त्याला योग्य साथ दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची एक वेळ ५ बाद ४८ अशी अवस्था झाली होती; पण त्यानंतर बालबर्नी व केव्हिन ओब्रायन यांनी सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करून लाज राखली. नवव्या व दहाव्या क्रमांकावर अनुक्रमे जॉर्ज डाकरेल (२५) आणि मॅक्स सोरेंसेन (२२) यांनी दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. त्याआधी, अमला (१२८ चेंडू, १५९ धावा) आणि ड्युप्लेसिस (१०९ चेंडू, १०९ धावा) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने विशाल धावसंख्या उभारली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाटी १२७ चेंडूंमध्ये २४७ धावांची भागीदारी केली. अमलाने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान २० शतके झळकाविण्याची कामगिरी केली. त्याने हा पराक्रम १०८ सामन्यांत केला. अमलाने शतकी खेळी १६ चौकार व ४ षटकारांनी सजवली, तर ड्युप्लेसिसच्या शतकी खेळीत १० चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. अमला व प्लेसिस ३ षटकांच्या अंतरात बाद झाले. ड्युप्लेसिसला केव्हिन ओब्रायनने क्लिन बोल्ड केले, तर अमला फिरकीपटू अँडी मॅकब्रायनचे लक्ष्य ठरला. रिली रोसोने ३० चेंडूंमध्ये नाबाद ६१ धावांची खेळी केली, तर डेव्हिड मिलरने नाबाद ४६ धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिका संघाने अखेरच्या १० षटकांत १३१ धावा वसूल केल्या. अमला व ड्युप्लेसिसच्या भागीदारीपूर्वी आयर्लंडचे वर्चस्व होते. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन मुनी याने दोन षटके निर्धाव टाकली आणि क्विंटन डिकॉकला (१) तंबूचा मार्ग दाखविला. आयर्लंडचा सर्वांत अनुभवी खेळाडू केव्हिन ओब्रायनला आज पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची संधी होती; पण अमलाचा उडालेला झेल शॉर्ट मिडविकेटला तैनात एड जॉयसला टिपण्यात अपयश आले. त्या वेळी अमला केवळ १० धावांवर खेळत होता. वेगवान गोलंदाज मॅक्स सोरेंसेनने एका षटकांत २४ धावा बहाल केल्यामुळे अमलावरील दडपण कमी झाले. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये अमलाने मुनीच्या एका षटकात २६ धावा वसूल केल्या. अमलाने कारकिर्दीतील सर्वोत्तम शतकी खेळी १०८व्या डावात पूर्ण केली. भारताचा विराट कोहली सर्वांत वेगवान २० वन-डे शतक झळकाविणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने ही कामगिरी १३३ सामन्यांमध्ये केली आहे. (वृत्तसंस्था)च्दक्षिण आफ्रिकेने गेल्या आठवड्यात वेस्ट इंडीजविरुद्ध सिडनी मैदानावर ५ बाद ४०८ धावांची मजल मारली होती. च्विश्वकप स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम भारताच्या नावावर आहे. भारताने २००७च्या विश्वकप स्पर्धेत बर्मुडा संघाविरुद्ध ५ बाद ४१३ धावांची मजल मारली होती.२० हाशीम आमलाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०व्या शतकाची नोंद केली. हर्षल गिब्जने २१ शतके केली आहे. आमला व डिव्हिलियर्स यांची प्रत्येकी २० शतके झाली आहे. १११ आमलाने १११व्या सामन्यात आपले २०वे शतक ठोकले व एक नवीन विक्रम प्रस्तापित केला. विराट कोहलीने १४१ सामन्यांत २० शतके केली आहेत. २४७ दक्षिण आफ्रिकेसाठी आमला व ड्युप्लेसिस यांनी २४७ धावांची केलेली भागीदारी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली. ०३ वर्ल्डकपमध्ये डीआरएस नियमांनुसार एका सामन्यात ३ निर्णय बदलण्याची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी दोन वेळा निर्णय बदलण्यात आले होते. दक्षिण आफ्रिका :- हाशिम अमला झे. जॉयस गो. मॅकब्रायन १५९, क्विंटन डिकॉक झे. विल्सन गो. मुनी १, फेफ ड्युप्लेसिस त्रि. गो. ओब्रायन १०९, एबी डिव्हिलियर्स झे. एन. ओब्रायन गो. मॅकब्रायरन २४, डेव्हिड मिलर नाबाद ४६, रिली रोसोयू नाबाद ६१. अवांतर : ११. एकूण : ५० षटकांत ४ बाद ४११. बाद क्रम : १-१२, २-२५९, ३-२९९, ४-३०१. गोलंदाजी : मुनी ७-२-५२-१, सोरेंसेन ६-०-७६-०, के. ओब्रायन ७-०-९५-१, डाकरेल १०-०-५६-०, स्टर्लिंग १०-०-६८-०, मॅकब्रायन १०-०-६३-२. आयर्लंड :- विलियम पोर्टरफिल्ट झे. ड्युप्लेसिस गो. एबोट १२, पॉल स्टर्लिंग झे. डिकॉक गो. स्टेन ९, एड जॉयस झे. अमला गो. स्टेन ०, नील ओब्रायन झे. अमला गो. एबोट १४, अँडी बालबर्नी झे. रोसोयू गो. मॉर्केल ५८, गॅरी विल्सन पायचित गो. एबोट ०, केव्हिन ओब्रायन झे. रोसोयू गो. एबोट ४८, जॉन मुनी त्रि. गो. डिव्हिलियर्स ८, जॉर्ज डाकरेल नाबाद २५, मॅक्स सोरेंसेन झे. डिकॉक गो. मोर्कल २२, अँडी मॅकब्रायरन नाबाद ०२. अवांतर : १२. एकूण : ४५ षटकांत सर्व बाद २१०. बाद क्रम : १-१७, २-२१, ३-२१, ४-४२, ५-४८, ६-१२९, ७-१५०, ८-१६७, ९-२००. गोलंदाजी : स्टेन ८-०-३९-२, एबोट ८-०-२१-४, मोर्कल ९-०-३४-३, ताहीर १०-१-५०-०, बेहारर्डियन २-०-१३-०, रोसोयू २-०-१३-०, ड्युप्लेसिस ४-०-३०-०, डिव्हिलियर्स २-०-७-१.