शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

दक्षिण आफ्रिकेची खराब सुरवात, २ बाद २८ धावा

By admin | Updated: November 5, 2015 17:28 IST

आर. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेचे फलंदाज आले आहेत. सुरवातीलाच त्यांना दोन धक्के मिळाले आहेत. अश्विनने स्टिअॅनला तर जडेजाने ड्यु प्लेसिसला तंबूत पाठवले.

ऑनलाइन लोकमत
चंदिगढ, दि. ५ - आर. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेचे फलंदाज आले आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी २८ धावांमध्ये अफ्रिकेचे दोन गडी तंबूत परतले होते. अश्विनने स्टिअॅनला तर जडेजाने ड्यु प्लेसिसला तंबूत पाठवले. १६ षटकानंतर द. आफ्रिकाने २ गडी गमावत २८ धावा केल्या आहेत. कर्णधार आमला(९) आणि डीन एल्गार (१३) मैदानावर खेळत आहेत.
त्यापुर्वी डीन एल्गारच्या फिरकीने पहिल्या कसोटीत सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या २०१ धावांवर संपुष्टात आला. मुरली विजयच्या ७५ व रविंद्र जडेजाच्या ३८ धावांची खेळी वगळता अन्य एकही फलंदाज आफ्रिकेच्या मा-यासमोर तग धरु शकला नाही. 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताचा शिखर धवन हा सलामीचा फलंदाज भोपळाही न फोडता बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर थोडा स्थिरावलेला पुजाराही ३१ धावांवर बाद झाला आणि विराट कोहलीही अवघी १ धाव काढून तंबूत परतला. त्यानंतर मुरली विजयने अजिंक्य रहाणेच्या साथीने सावध फलंदाजी करत भारताला १०० धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र त्यानंतर रहाणे (१५) व त्यापाठोपाठी वृद्धीमान सहा (०) पटापट बाद झाले. मुरली विजयने ७५ धावांची संयमी खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्मरच्या गोलंदाजीवर विजय पायचीत झाला व भारताच्या आशा मावळल्या. यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विनने (२०) एकाकी झूंज देत भारताला १७५ चा पल्ला गाठून दिला.  उमेश यादव ५ तर वरुण अॅरोन शून्यावर बाद झाला. आफ्रिकेतर्फे एल्गारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर इम्रान ताहिर व फिलँडरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हार्मर व रबादाने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावाही गाठता आल्या नाहीत. 
टी-२० आणि वन डे मालिकेतील पराभवानंतर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने भारताची अवस्था बिकट झाली आहे.