शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा धावांचा डोंगर

By admin | Updated: August 19, 2015 23:08 IST

ओम्पिलो रामेला (११२) याच्या शतकानंतर क्वांटन डिकॉकच्या (११३) शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बुधवारी अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ५४२ धावांचा डोंगर

पुणे : ओम्पिलो रामेला (११२) याच्या शतकानंतर क्वांटन डिकॉकच्या (११३) शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बुधवारी अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ५४२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताचा डाव मात्र गडगडला. दिवसभराचा खेळ संपला, तेव्हा भारताने ३ गडी गमावून १२२ धावा केल्या होत्या.दक्षिण आफ्रिकेचा नाईट वॉचमन डेन पीट याने भारतीय गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा पाहिली. दुसऱ्या बाजूने डिकॉकने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली होती. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. पीट १६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर डिकॉक याने डेन विलास याला बरोबर घेऊन भारतीय गोलंदाजांचा समाचार घेणे सुरूच ठेवले. तिरंगी मालिकेत दोन्ही सामन्यांत शतक झळकावणाऱ्या डिकॉकने आपली कामगिरी तशीच सुरू ठेवली. बदली गोलंदाज ईश्वर पांडे याच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने १३ चौकार व ३ षटकारांच्या साह्याने शतक झळकावले.डेन विलास यानेही तुफानी फलंदाजी करून ७४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या साह्याने ७५ धावा केल्या. या दोघांची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर मात्र आफ्रिकेचा डाव गडगडला. त्यांचे ४ फलंदाज ५० धावांतच बाद झाले. केशवमहाराज याने १९ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने ११५ धावांत ४ बळी मिळविले. अय्यर व जयंत यादव यांनी प्रत्येकी २, तर मिथुन व पांडे यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला.प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या भारतीय संघांची सुरुवात मात्र काहीशी डळमळीत झाली. जीवनज्योतसिंग व अभिनव मुकुंद यांनी पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. जीवनज्योतने ३९ चेंडूंत ३ चौकारांच्या साह्याने २२ धावा केल्या. अभिनव मुकुंद याने ७५ चेंडूंत ६ चौकारांच्या साह्याने ३९ धावा केल्या. अय्यरने आज आत्मविश्वासपूर्वक खेळी केली. मात्र, त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. त्याने ६१ चेंडूंत ४९ धावा केल्या. भारत ‘अ’ अजून दक्षिण आफ्रिका ‘अ’पेक्षा ४२० धावांनी मागे आहे.( वृत्तसंस्था)