पणजी : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी होणाऱ्या आव्हानात्मक सामन्यासाठी घाम गाळला, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला भारताचे माजी प्रशिक्षक गुरू गॅरी कर्स्टन यांनी मार्गदर्शन केले.कर्स्टन यांना भारतीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे आफ्रिकेला कर्स्टनच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होईल. त्यामुळे हा संघ विजयी व्यूहरचना आखूनच मैदानात उतरणार आहे. कर्स्टन हे २००८ ते २०११ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने विश्वचषक जिंकला होता. त्यांना क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने विश्वचषकासाठी आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसी आणि आपला तेज गोलंदाज अॅलन डोनाल्ड यांच्यासोबत सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. (वृत्तसंस्था)
दक्षिण आफ्रिकेला ‘गॅरी मंत्र’!
By admin | Updated: February 19, 2015 02:31 IST