शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

दक्षिण आफ्रिका भारतीय युथ ब्रिगेडविरुद्ध विजयासाठी उत्सुक

By admin | Updated: September 29, 2015 00:07 IST

युवा व अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ ७२ दिवसांच्या भारत दौऱ्याची सुरुवात मंगळवारी भारत ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० सराव सामन्याने करणार आहे.

नवी दिल्ली : युवा व अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ ७२ दिवसांच्या भारत दौऱ्याची सुरुवात मंगळवारी भारत ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० सराव सामन्याने करणार आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघासाठी ही लढत म्हणजे भारतीय वातावरणासोबत जुळवून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मनदीप सिंगच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या लढतीनंतर दक्षिण आफ्रिका संघाला २ आॅक्टोबरला धर्मशाला येथे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळायचा आहे. दक्षिण आफ्रिका संघात कर्णधार फाफ डू प्लेसिस, कसोटी कर्णधार हाशिम अमला, वन-डे कर्णधार एबी डिव्हिलियर्स, लेगस्पिनर इम्रान ताहिर आणि सीनिअर फलंदाज जेपी ड्युमिनी या सीनिअर खेळाडूंचा समावेश आहे. डेव्हिड मिलर व क्विंटन डीकॉक या टी-२० स्पेशालिस्ट फलंदाजांच्या समावेशामुळे दक्षिण आफ्रिका संघ मजबूत झाला आहे. पालम एअरफोर्स मैदानाचा आकार बघता डिव्हिलियर्स, डु प्लेसिस आणि मिलर यांच्याकडून आक्रमक खेळीची आशा आहे. डेल स्टेन व मोर्नी मोर्केल यांच्या अनुपस्थितीतही दक्षिण आफ्रिका संघाची गोलंदाजीची बाजू मजबूत आहे. एल्बी मोर्केल, ख्रिस मॉरिस, ताहिर आणि केली एबोट टी-२० क्रिकेटमध्ये चांगले गोलंदाज आहेत. त्यांनी आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवला आहे.यजमान भारतीय बोर्ड अध्यक्ष इलेव्हन तसे बघता भारताचा ‘क’ दर्जाचा संघ आहे. कारण भारत ‘अ’ संघ बंगळुरूमध्ये बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्ध तीनदिवसीय सामन्यात सहभागी झाला आहे. दक्षिण आफ्रिका संघाच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असलेल्या भारताच्या युवा संघातील खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या संघातील एकही खेळाडू सीनिअर संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत नाही, पण पाच महिन्यांनंतर होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्यांना निवड समितीचे लक्ष वेधण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे. फिरकीपटू यजुवेंद्र चहल, पवन नेगी आणि कुलदीप यादव मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास उत्सुक आहेत. कारण आर. आश्विनचा अपवाद वगळता टी-२० क्रिकेटमध्ये कुठल्याही फिरकीपटूचे भारतीय संघातील स्थान निश्चित नाही. फलंदाजीमध्ये मयंक अग्रवालने अलीकडेच भारत ‘अ’ संघातर्फे चमकदार कामगिरी केली होती. मनन व्होरा याला आयपीएल आणि सैयद मुश्ताक अली चषक स्पर्धेत यापूर्वी खेळल्या गेलेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये ४० पेक्षा अधिक धावा फटकावता आलेल्या नाहीत. मनीष पांडे आणि संजू सॅम्सन दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजांविरुद्ध धावा फटकावण्यास उत्सुक आहेत. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघभारत बोर्ड अध्यक्ष इलेव्हन : मनदीप सिंग (कर्णधार), मयंक अग्रवाल, मनन व्होरा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, संजू सॅम्सन, हार्दिक पंड्या, ऋषी धवन, अनुरित सिंग, यजुवेंद्र चहल, पवन नेगी, कुलदीप यादव.दक्षिण आफ्रिका टी-२० संघ :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, फरहान बेहार्डियेन, क्विंटन डीकॉक, मर्चेंट डी लांगे, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहिर, एडी एल, केली एबोट, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, एल्बी मोर्केल, खाया जोंडो.