शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

दक्षिण आफ्रिका-बांगलादेश कसोटी अनिर्णीत

By admin | Updated: August 4, 2015 00:39 IST

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशदरम्यान सुरू असलेला दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आज

ढाका : दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशदरम्यान सुरू असलेला दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आज अनिर्णीत राहिला. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे अखेरचे चार दिवस खेळ होऊ शकला नाही.शेर-ए-बांगला स्टेडियमवर अखेरच्या दिवसाचा खेळ आऊटफिल्ड ओलसर असल्यामुळे सकाळीच रद्द करण्यात आला. या कसोटीत फक्त पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला. त्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून ८ बाद २४६ धावा केल्या होत्या.या सामन्यात वेगवान गोलंदाज डेल स्टेन कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी मिळवणारा शॉन पोलॉकनंतर दुसरा दक्षिण आफ्रिकन गोलंदाज ठरला. चित्तगाव येथील पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्यामुळे ही मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.ही मालिका विचित्र होती, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम आमला याने म्हटले. तो म्हणाला, ‘‘जर ही कसोटी दक्षिण आफ्रिकेत असती, तर ती कालच रद्द झाली असती. या आऊटफिल्डवर खेळणे शक्यच नव्हते. ही खूपच विचित्र मालिका होती. मी अशा प्रकारची मालिका खेळलो नाही, की ज्यात १० दिवसांपैकी ६ दिवस पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.’’ (वृत्तसंस्था)