शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिका ७ बाद २६७

By admin | Updated: January 15, 2016 02:23 IST

स्टिवन फिन, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड व मोईन अली यांच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला

जोहान्सबर्ग : स्टिवन फिन, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड व मोईन अली यांच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला ७ बाद २६७ धावांवर रोखले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या डीन एल्गरने सर्वाधिक ४६ धावा केल्या. त्याने १२२ चेंडूंत संयमी फलंदाजी करीत ५ चौकारांसह ही धावसंख्या उभी केली. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने ४० चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ३६ धावा केल्या. विकेटकीपर डेन विलासने ३८ चेंडूंत ४ चौकारांसह २६ धावांचे योगदान दिले. विलास आऊट झाल्यानंतर क्रिस मॉरिसने एक बाजू सांभाळत नेली. त्याने ५० चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद २६ धावा केल्या. गॅगीसो रबादाने २० धावा करत चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा क्रिस मॉरिस २६ व रबादा २० धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीकडून मदत मिळत असल्यामुळे पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी वान जिल व डीन एल्गर यांना सुरुवातीला स्टीव्हन फिनच्या भेदक माऱ्याला सामोरे जावे लागले. या दोघांनी सलामीला ४४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडच्या कर्णधाराने गोलंदाजीसाठी स्टोक्सला पाचारण केले. त्याने तिसऱ्याच चेंडूवर इंग्लंडला यश मिळवून दिले. स्टोक्सच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर जिलने आॅफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला; पण चेंडू जिलच्या बॅटला चाटून यष्टिरक्षक जॉनी बेयरस्टाच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला. (वृत्तसंस्था)