नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्ंिसग प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने नेमलेल्या मुद्गल चौकशी समितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचाही समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधिश मुकूल मुद्गल तसेच वकील एल. नागेश्वर राव, नीलय दत्ता आणि वरिष्ठ आयपीएल अधिकारी बी. बी. मिश्रा यांचा समावेश आहे.न्या. मुद्गल म्हणाले, की आम्ही सौरवला आयपीएल चौकशी समितीत सहभागी होण्यासाठी आग्रह धरला होता आणि तो राजी झाली. मी स्वत: त्याला फोन केला होता. त्यानेही आमची विनंती मान्य केली आहे. आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने काही क्रिकेटपटूंची मदत घेण्याचे निर्देश दिले होते. ज्या क्रिकेटपटूंची ओळख ही प्रमाणिक आहे, त्यांचा आग्रहाने समावेश करावा, असेही सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले होते, यानुसार सौरवचा समावेश समितीत करण्यात आला आहे.
सौरव गांगुली मुद्गल समितीत
By admin | Updated: June 9, 2014 04:14 IST