झोपडपी फुटबॉल
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
राष्ट्रीय झोपडपी
झोपडपी फुटबॉल
राष्ट्रीय झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेचे आयोजननागपूर : क्रीडा विकास संस्थेतर्फे १३ ते १५ फेब्रुवारीपर्यंत पुरुष गटाची १३ वी भारतरत्न राजीव गांधी स्मृती राष्ट्रीय झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा आयोजित सदर येथील कस्तुरबा लायब्ररी मैदानावर होत आहे. स्पर्धेत १६ राज्यांच्या संघात विजेतेपदासाठी झुंज होणार असल्याची माहिती क्रीडा विकास संस्थेचे सचिव प्रा. विजय बारसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सायंकालीन सत्रात होणाऱ्या स्पर्धेत पहिले दोन दिवस साखळी सामने होणार आहेत. १५ फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात उपांत्य सामने, तिसऱ्या स्थानाची लढत आणि ५ ते ८ व्या स्थानाच्या मानांकनासाठी सामने होणार आहेत. सायंकाळच्या सत्रात अंतिम लढत होईल़ सामने २६ बाय १६ मीटरच्या मैदानावर होणार असून, चार खेळाडूंचा संघ खेळणार असल्याचे बारसे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला किशोर जिचकार, गुरुमूर्ती पिल्ले, डॉ. अभिजित बारसे उपस्थित होते.(क्रीडा प्रतिनिधी)