शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू, श्रीकांत दुसर्‍या फेरीत

By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताची पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अनुक्रमे महिला व पुरुष गटाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताची पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अनुक्रमे महिला व पुरुष गटाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत दोन वेळा (२०१३ व २०१४) कांस्यपदक जिंकलेल्या ११ व्या मानांकित सिंधूने चुरशीच्या झालेल्या लढतीत डेन्मार्कच्या लाइन जार्सफेल्टचा ११-२१, २१-१७, २१-१६ गुणांनी पराभव करीत दुसर्‍या फेरीतील आपली जागा निि›त केली. विश्व क्रमवारीत १३ व्या नंबरवर असलेली सिंधू या सत्रात दुखापतीमुळे त्रस्त होती. तिसर्‍या फेरीत बाय मिळालेली सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक विजेती व नंबर वन खेळाडू चीनची ली शुएरुईिवरुद्ध खेळेल.
विश्व क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारताच्या श्रीकांतने पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या मायकल फरिमनला २१-१०, २१-१३ गुणांनी फक्त २४ मिनिटांत नमवून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. इंडियन ओपन विजेता श्रीकांतला पुढच्या फेरीत चिनी तैपेईच्या सू जेन हाओविरुद्ध खेळावे लागणार आहे.
-----
चौकट : सिंधूला पहिल्या सुरुवातीपासून कडवे आव्हान देत विश्व क्रमवारीत ३५ व्या नंबरवर असलेल्या लाइनने ६-० अशी आघाडी घेत पहिली गेम सहज जिंकली. दुसर्‍या गेममध्ये सिंधूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत ५-२ अशी आघाडी घेतली. पण लाईनने ७-७ अशी बरोबरी साधली. सिंधूने नंतर काही नेत्रदीपक प्लेसिंग नेट जवळ करीत गेम जिंकली. तिसर्‍या गेममध्ये लाइनने ४-१ अशी आघाडी घेतली; पण ही आघाडी लाइनला जास्त टिकविता आली नाही. सिंधूने जोरदार शॉट मारून आणि प्लेसिंग करीत सलग चार गुण घेत बरोबरी तर साधलीच; पण नंतर आघाडी घेत गेम जिंकली.
----------- (वृत्तसंस्था)
===============================