शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
3
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
4
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवीयन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
5
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
6
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
7
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
8
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
9
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
10
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
11
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
12
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
13
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
16
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
17
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
18
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र
19
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
20
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!

आॅलिम्पिक महासंघाला कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: December 29, 2016 01:23 IST

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी यांनी बुधवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे आजीवन अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला, तर क्रीडा

नवी दिल्ली : वादाच्या भोवऱ्यात सापडलेले क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी यांनी बुधवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे आजीवन अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला, तर क्रीडा मंत्रालयाने आयओएला या वादग्रस्त निर्णयासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कलमाडी यांनी आयओएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘माझी आजीवन अध्यक्षपदी निवड करणाऱ्या भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे आभार व्यक्त करतो, पण यावेळी हा सन्मान स्वीकारणे योग्य ठरणार नाही. मला क्लीन चिट मिळेल, असा मला विश्वास आहे, पण तोपर्यंत या सन्मानाचा स्वीकार करू शकत नाही.’ कलमाडी आणि अन्य एक वादग्रस्त माजी अध्यक्ष अभय सिंग चौटाला यांची मंगळवारी आयओएच्या चेन्नईमध्ये झालेल्या वार्षिक आमसभेमध्ये आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर वाद निर्माण झाला आणि मंत्रालयाने बुधवारी आयओएला कारणे दाखवा नोटीस बजावताना ताकीद दिली की, या दोघांना हटविल्याशिवाय किंवा त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय आयओएसोबत कुठलेही संबंध ठेवण्यात येणार नाही. क्रीडामंत्री विजय यांना पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, ‘आयओएच्या वार्षिक आमसभेमध्ये या दोघांची आजीवन अध्यक्षपदी निवड करणे घटनाविरोधी असून मंत्रलायाला स्वीकारार्ह नाही. दोघांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या दोघांच्या निवडीमुळे मी निराश आहे. जोपर्यंत त्यांना वगळण्यात येत नाही किंवा ते राजीनामा देत नाही तोपर्यंत मंत्रालय आयओएसोबत कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही.’गोयल पुढे म्हणाले, ‘आयओए अशाप्रकारचे निर्णय घेणार असेल तर सरकारला विचार करावा लागेल. या निर्णयाचा चुकीचा संदेश गेला असून लोक नाराज झाले आहेत. आम्ही खेळामध्ये पारदर्शिता, सुशासन आणण्याचा प्रयत्न करीत असून, सर्व क्रीडा महासंघांनी आचारसंहितेचे पालन करायला हवे.’दरम्यान, आयओएचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांना या निर्णयावर टीका केली असून दोघांनी पदाचा त्याग करावा, असे आवाहन केले. बत्रा म्हणाले, ‘मी लवकरच आयओएचा राजीनामा देणार आहे. कारण सुशासन नसलेल्या संघटनेसोबत जुळून राहण्यास कुठले स्वारस्य नाही. क्लीन चिट मिळेपर्यंत या दोघांनी कुठलेही पद स्वीकारू नये, असे मी आवाहन करतो. प्रत्येकाचा एक काळ असतो. त्यानंतर त्याला पद सोडावे लागते. कुणीच संघटनेवर नेहमीसाठी राहू शकत नाही. त्यामुळे विदेशात भारताची प्रतिमा मलीन होते. तेथे सुशासन आणि पारदर्शिता यावर लक्ष केंद्रित करण्यात येते.’दरम्यान, माजी क्रीडामंत्री अजय माकन यांनी आयओएचा निर्णय दु:खद व वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. माकन म्हणाले, ‘माजी क्रीडामंत्री व खेळाचा चाहता असल्यामुळे कलमाडी व चौटाला यांची आयओएच्या आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या निर्णयाची निंदा करतो. या निर्णयाविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, असे निवदेन क्रीडामंत्र्यांना देणार आहे. सर्व क्रीडा महासंघाने मंत्रालयातर्फे अनुदान मिळते. त्यामुळे सरकारने आपल्या अधिकाराचा वापर करायला हवा.’माकन यांनी भाजपा खासदान अनुराग ठाकूर, शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखदेवसिंग ढिंढसा, आयओएचे सध्याचे उपाध्यक्ष तरलोचन सिंग यांनाही या निर्णयाचा विरोध न केल्यामुळे दोषी धरले. (वृत्तसंस्था)चौटाला यांची वादग्रस्त कारकिर्दचौटाला डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत आयओएचे अध्यक्ष होते. आरोपपत्र असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात आल्याचा ठपका ठेवत, आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने राष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेवर निलंबनाची कारवाई केली होती. आयओसीने त्यानंतर आयओएच्या अध्यक्षपदी चौटाला यांची निवड रद्द ठरविली होती. ‘क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या प्रतिक्रियेचे आश्चर्य वाटले. त्यांचा दावा आहे की, माझ्याविरुद्ध गुन्हेगारी व भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. माझ्याविरुद्ध कुठल्याही गुन्ह्याचे प्रकरण नसून, हे सर्व राजकीय प्रकरणे आहेत. भारतात आॅलिम्पिक खेळासाठी मोठी मेहनत घेतल्यामुळे मी या पदाचा दावेदार आहे.’- अभय सिंग चौटाला