शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

नेमबाजी विश्वचषक : मनू भाकरने साधला सुवर्णवेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:21 IST

दोन वेळा विश्वविजेती राहिलेली यजमान देशाची अलेक्झांड्रा जावाला हिला नमवून भारतीय नेमबाज मनू भाकर हिने मेक्सिकोतील गुआदालाजरा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी दहा मीटर एअर पिस्तुलचे सुवर्ण जिंकले. त्याचवेळी पुरुष गटात रवी कुमारला कांस्यवर समाधान मानावे लागले.

नवी दिल्ली - दोन वेळा विश्वविजेती राहिलेली यजमान देशाची अलेक्झांड्रा जावाला हिला नमवून भारतीय नेमबाज मनू भाकर हिने मेक्सिकोतील गुआदालाजरा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी दहा मीटर एअर पिस्तुलचे सुवर्ण जिंकले. त्याचवेळी पुरुष गटात रवी कुमारला कांस्यवर समाधान मानावे लागले.२४ शॉटच्या अंतिम लढतीत मनूने २३७.५ गुणांची कमाई केली. जावालाने २३७.१ गुण मिळविले. फ्रान्सची सेव्हिले गोबरविले हिने कांस्य पदक मिळविले.अकरावीला शिकणाºया मनूने अलीकडेच २०१८ च्या ब्यूनस आयर्स युवा आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला. आता सुवर्ण जिंकून तिने सत्रातील पहिल्या विश्वचषकात देशासाठी शानदार कामगिरी केली आहे.याआधी रवी कुमार याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून विश्वचषकात स्वत:च्या पदकाचे खाते उघडले. रवीने मागच्यावर्षी तीन फायनलमध्ये स्थान मिळविले होते. पण पदक मात्र मिळाले नव्हते. त्याने २२६.४ गुणांची कमाई केली.तिसºया आणि चौथ्या स्थानाच्या चढाओढीत रवीने आपलाच सहकारी दीपक कुमारला शूटआऊटमध्ये मागे टाकले. त्याचवेळी हंगेरीचा प्रतिभावान युवा खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला इस्तवान पेनी याने २४९.५ गुणांसह सुवर्ण तसेच आॅस्ट्रियाचा अलेक्झांडर शिर्मिल याने २४८.७ गुणांसह रौप्यची कमाई केली.स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी शाहजर रिझवी आणि जीतू राय यांनी पुरुषांच्या दहा मीटर पिस्तुल प्रकारात क्रमश: सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकले होते. मेहुली घोष हिने महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती. (वृत्तसंस्था)कोण आहे मनू भाकर...हरियाणातील दादरी येथे वास्तव्य करणारी १६ वर्षीय मनू भाकर इयत्ता अकरावीला शिकते. दोन वर्षांपूर्वी तिने नेमबाजी सुरू केली.मनूने जपानमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकले होते. गतवर्षी मनूने दोन राष्टÑीय विक्रमांची नोंद केली. तीने बॉक्सिंग व मार्शल आर्टमध्येही प्राविण्य मिळविले आहे. मणिपूरचा मार्शल आर्ट प्रकार ‘थांगता’ हा खेळ तिला अवगत असून जखमी झाल्यामुळे आईने तिला बॉक्सिंग करण्यास मनाई केली.मार्शल आर्ट प्रकारातील थांगता खेळामध्ये जखमी झाल्यानंतर मनूने नेमबाजीकडे आपले लक्ष केंद्रीत केले.मनूने सुवर्ण पदकाच्या रुपाने पहिल ेविश्वचषक पदक पटकावले.सुवर्ण जिंकून मी फार आनंदी आहे. विश्वचषकातील माझे हे पहिलेच पदक आहे. आगामी स्पर्धांमध्ये याहून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल.- मनू भाकर,महिला नेमबाज.युवा भारतीय नेमबाजांची पाहता ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. भविष्यात भारतीय नेमबाजी जगात वर्चस्व मिळवेल, याचे हे संकेत आहेत. मनू आणि रवी मागच्या वर्षीपासून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहेत.- रानिंदरसिंग,अध्यक्ष एनआरएआय.

टॅग्स :Sportsक्रीडा