शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आशियाडमध्ये पदक जिंकणारच!;नेमबाज राही सरनोबतचे ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 04:42 IST

दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मुंबई : दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.आशियाड माझ्यासाठी आव्हानात्मक असून मी तयारी चांगली केली असल्याचे सांगून २७ वर्षांची राही म्हणाली, ‘आशियाडसाठी १५ दिवसांचा अवधी आहे. पाठोपाठ कोरियात विश्व चॅम्पियनशिपचेही आयोजन असेल.’ आशियाडमध्ये पदकाची खात्री आहे काय, असे विचारताच ती म्हणाली, ‘विजय तर निश्चित मिळेल. यात काही शंका नाही.’राहीने २०१० च्या नवी दिल्ली आणि २०१४ च्या ग्लासगो राष्टÑकुलच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदके जिंकली आहेत. खांद्याच्या खालच्या भागात (काखेत) जखम झाल्याने तिला वर्षभर खेळास मुकावे लागले होते. तेव्हापासून तिची कामगिरी खालावत गेली. नव्या दमाने उभारी घेण्यास सज्ज झालेली राही म्हणाली, ‘खेळात स्पर्धा अनुभवणे आवडते. भारतीय महिला यासाठी सज्ज असल्याचाआनंद वाटतो. इंचियोन आशियाडची अंतिम फेरी गाठून कांस्य जिंकले होते. यंदा याहून सरस कामगिरी करण्यास मी सज्ज आहे.’ (वृत्तसंस्था)नेमबाजी माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. २०१६ मध्ये जखमेमुळे वर्षभर नेमबाजीस मुकले. २०१७ पासून हवे तसे यश मिळू शकले नाही.- राही सरनोबत

टॅग्स :Sportsक्रीडा