शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिव थापा, देवेंद्रो उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: August 30, 2015 22:42 IST

विद्यमान चॅम्पियन शिव थापा (५६ किलो) आणि गेल्या वेळेसचा रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रो सिंह (४९ किलो) यांनी आज आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत

बँकॉक : विद्यमान चॅम्पियन शिव थापा (५६ किलो) आणि गेल्या वेळेसचा रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रो सिंह (४९ किलो) यांनी आज आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली; परंतु गेल्या वेळेस रौप्यपदक जिंकणाऱ्या मनदीप जांगडा (६९ किलो) याचे आव्हान संपुष्टात आले.शिवने प्री क्वॉर्टर फायनलमध्ये जॉर्डनच्या मोहम्मद अलवादी याचा ३-0 ने पराभव केला, तर देवेंद्रोने चीनच्याच जुनजुन याचा याच फरकाने पराभव केला. तथापि, मनदीपला जपानच्या यासुहीरो सुजुकीकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला.भारताकडून दिवसाची सुरुवात देवेंद्रोने केली आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या या खेळाडूने प्रारंभापासूनच आक्रमक पावित्रा अवलंबला. त्याने प्रतिस्पर्ध्यांवर ठोशांचा वर्षाव करताना त्याला बॅकफूटवर ढकलले.भारतीय मुष्टियोद्ध्याने पहिल्या फेरीत पूर्ण वर्चस्व राखले. त्याचा फायदा पुढील दोन्हीही फेरीत मिळाला. देवेंद्रोच्या या तडफदार कामगिरीमुळे प्रतिस्पर्धी खेळाडू शेवटपर्यंत सावरू शकला नाही.शिवथापानेही चातुर्यपणे खेळ करताना जॉर्डनच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध महत्त्वपूर्ण गुण वसूल केले. प्रत्युत्तरात हल्ला करण्याचे कसब असणाऱ्या या भारतीय मुष्टियोद्ध्याने प्रारंभी हल्ला करताना प्रतिस्पर्ध्याला उचकवले. जॉर्डनच्या मुष्टियोद्ध्याने तिसऱ्या फेरीत मुसंडी मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व अखेरच्या ३0 सेकंद पूर्ण वर्चस्व राखले; परंतु तो भारतीय मुष्टियोद्ध्याची सुरुवातीची आघाडी कमी करू शकला नाही. तथापि, मनदीपने निराशा केली. त्याला त्याच्यापेक्षा उंच असलेल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागला. यावर्षीच्या अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूला बचाव करताना केलेल्या चुकाही महागात पडल्या.(वृत्तसंस्था)