शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

शिखर धवन व यादव सर्वोत्तम!

By admin | Updated: March 28, 2015 01:56 IST

विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध ९५ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ जेतेपद राखण्यात अपयशी ठरला.

नवी दिल्ली : विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध ९५ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ जेतेपद राखण्यात अपयशी ठरला. या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या भारतीय संघातर्फे फलंदाजीमध्ये सलामीवीर शिखर धवन आणि गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज उमेश यादव यांची कामगिरी सर्वोत्तम ठरली. शिखरने ८ सामन्यांत ५१.५० च्या सरासरीने भारतातर्फे सर्वाधिक ४१२ धावा फटकावल्या. त्यात दोन शतकी आणि एका अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. उमेश यादवने उपांत्य फेरीत चार बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीला पिछाडीवर सोडले. यादवने ८ सामन्यांत १७.८३ च्या सरासरीने १८ बळी घेतले. क्षेत्ररक्षणामध्ये उमेश यादवने सर्वाधिक ८ झेल टिपले. शिखरने ७, रैनाने ६, शमी, विराट व अजिंक्य रहाणे यांनी प्रत्येकी पाच झेल टिपले. यष्टिरक्षणामध्ये धोनीने यष्टीपाठी १५ बळी घेतले. अंतिम लढतीपूर्वी तो सर्वांत आघाडीवर आहे. अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन व न्यूझीलंडचा यष्टिरक्षक ल्युक रोंची यांना अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. हॅडिनने १४ व रोंचीने १३ बळी घेतले आहेत. भारताने या विश्वकप या स्पर्धेत सर्वाधिक स्कोअर (७ बाद ३०७ धावा) साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवला. भारताने बांगलादेश व पाकिस्तानविरुद्धही ३०० धावांचा आकडा गाठला होता. विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम शिखर व रोहित यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. शिखरने मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३७ व रोहितने याच मैदानावर बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत १३७ धावांची खेळी केली होती. शिखरने या स्पर्धेत हॅमिल्टनमध्ये आयर्लंडविरुद्ध १०० धावा केल्या होत्या. भारतातर्फे या स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या अन्य फलंदाजांमध्ये सुरेश रैना (नाबाद ११०) आणि विराट कोहली (१०७) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)फलंदाजी...शिखरनंतर रोहित शर्मा (३३०) दुसऱ्या स्थानी आहे; तर विराट कोहली (३०५) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सुरेश रैना (२८४), कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२३७) आणि रहाणे (२०८) यांचा क्रमांक लागतो. गोलंदाजी...उमेश यादवनंतर (१८) मोहम्मद शमी (१७), मोहित शर्मा (१३), रवीचंद्रन आश्विन (१३) आणि रवींद्र जडेजा (९) यांचा क्रमांक लागतो.