शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

शशांक मनोहर यांचा आयसीसी चेअरमनपदाचा राजीनामा

By admin | Updated: March 16, 2017 01:31 IST

बीसीसीआयवर वैधानिक संकट येताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत विराजमान झालेले अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी आश्चर्यकारक निर्णय घेऊन अवघ्या ८ महिन्यांत आयसीसी चेअरमनपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला

दुबई : बीसीसीआयवर वैधानिक संकट येताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत विराजमान झालेले अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी आश्चर्यकारक निर्णय घेऊन अवघ्या ८ महिन्यांत आयसीसी चेअरमनपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मे २०१६मध्ये मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, मनोहर यांनी वैयिक्तक कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. ५९ वर्षांचे मनोहर यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता.मनोहर यांनी आपले राजीनामापत्र आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठविले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘गेल्या वर्षी माझी आयसीसीच्या चेअरमनपदी एकमताने निवड झाली होती. मी आयसीसीचा पहिला स्वतंत्र चेअरमन बनलो. समितीच्या प्रत्येक निर्णयात आपले सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा आणि नि:पक्षपातीपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, आता वैयिक्तक कारणांमुळे या पदावर राहणे मला शक्य होणार नाही; त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे.’’‘कर्तव्यकठोर प्रशासक’ अशी ओळख असलेले मनोहर यांनी दोन वेळा भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद भूषविले होते. २५ सप्टेंबर २००८ ते १९ सप्टेंबर २०११ दरम्यान मनोहर यांनी पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर २०१५मध्ये जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा शशांक मनोहर यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते.आयसीसी चेअरमनपद भूषणविण्याची संधी मिळाल्यावर मनोहर यांनी १० मे २०१६ रोजी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दरम्यान १२ मे २०१६ रोजी त्यांची आयसीसी चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची वेळ येताच मनोहर यांनी बीसीसीआयमधून पळ काढल्याचे आणि बुडते जहाज सोडून सुरक्षित स्थळ शोधल्याची टीका बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी मनोहर यांच्यावर त्या वेळी केली होती.आयसीसीने शशांक मनोहर यांचा राजीनामा मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मनोहर यांचा ई-मेल मिळाला असून, परिस्थितीचे आकलन केल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे स्पष्ट करण्यात आले.(वृत्तसंस्था) या कारणामुळे दिला राजीनामा!आयसीसीत कायदेशीर आणि आर्थिक सुधारणा करण्यास मनोहर यांनी सुरुवात केली होती. त्यांनी त्यासाठी ‘बिग थ्री’(भारत, आॅस्ट्रेलिया व इंग्लंड) यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. या सुधारणा आयसीसीच्या पुढील बैठकीत पारित होणार होत्या. बीसीसीआयने याविरुद्ध मोर्चेबांधणी करून बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा पाठिंबा मिळविला. आर्थिक सुधारणा पारित करण्यासाठी दोनतृतीयांश बहुमत असावे लागते. बीसीसीआयचा संभाव्य विरोध लक्षात घेऊन त्यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांचे मत आहे.