शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

शार्दूलच्या गोलंदाजीची चमक

By admin | Updated: November 1, 2015 03:08 IST

भारताचा अध्यक्षीय संघ व दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दोन दिवसीय सराव सामन्यात मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर याने ४ मोहरे टिपून आफ्रिकेला अडचणीत आणले.

मुंबई : भारताचा अध्यक्षीय संघ व दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दोन दिवसीय सराव सामन्यात मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर याने ४ मोहरे टिपून आफ्रिकेला अडचणीत आणले. मात्र, धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने शतकी खेळी करून संघाचा डाव सावरला. तर, डेन विलास व डेल स्टेन यांनी तळाच्या क्रमांकावर केलेल्या आश्वासक फलंदाजीच्या बळावर आफ्रिकेने सामना अनिर्णीत राखला. मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर हा सामना झाला. नाणेफेक जिंकून भारत अध्यक्षीय संघाने ७८.५ षटकांत २९६ धावांची खेळी केली. त्याला प्रत्युत्तर देताना उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा डाव कोलमडला. शार्दूल ठाकूर याने स्टिअन वान झ्याल (१८) याला उन्मुक्त चंद याच्याकडे झेल देण्यास भाग पाडून पहिला झटका दिला. पाठोपाठ सिमॉन हार्मर (४), फाफ डु प्लेसिस (४) यांना ठाकूरने बाहेरचा रस्ता दाखविला. हशीम आमला (१) याला यादवने त्रिफळा बाद केले, तर नथूसिंग याने डीन एल्गर (२३) याला उन्मुक्त चंदकरवी झेलबाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची १ बाद ३८वरून ५ बाद ५७ धावा, अशी बिकट अवस्था झाली. त्यानंतर डिव्हिलियर्सने टेम्बा बावुमा याच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पंड्याने बावुमा (१५) याला श्रेयस अय्यर याच्याकरवी झेलबाद करून ही जोडी फोडून आफ्रिकेची ६ बाद १११ अशी स्थिती केली. त्यानंतर डिव्हिलियर्सने डेन विलासला हाताशी घेऊन संघाचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. विलासला (५४) त्रिफळाबाद करून जयंत यादवने ही जोडी फोडली. त्यानंतर डिव्हिलियर्सने १३१ चेंडूंत ११२ धावांची दमदार खेळी करून संघाला अश्वासक स्थितीत आणले. त्याने १८ चौकारांच्या साह्याने आपली खेळी साजरी केली. डिव्हिलियर्सनंतर डेल स्टेनने दहाव्या क्रमांकावर येऊन २८ चेंडूंत ३७ धावा फटकावल्या. कुलदीप यादवने व्हेरॉन फिलँडर व स्टेनला पाठोपाठ बाद करून ३०२ धावांवर आफ्रिकेचा डाव संपुष्टात आणला. फिरकी सोडून इतर खेळपट्टीवर बळी घेऊ शकतोपूर्णत: फिरकीसाठी अनुकूल असणारी खेळपट्टी सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर मला बळी मिळविण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शार्दूल ठाकूर याने दिली. तसेच, हाशीम आमलाचा महत्त्वपूर्ण बळी मिळविण्याबाबत विचारले असता शार्दूल म्हणाला, ‘‘आमलाला झटपट बाद होताना मी पाहिले आहे; मात्र तो लयीत आल्यावर त्याला बाद करणे अवघड असते. त्यामुळे बाहेरील बाजूने स्विंग होणाऱ्या चेंडूंचा मारा करण्यावर भर दिला.’’ शार्दूलने हे चारही बळी २५ चेंडूंत ८ धावांच्या मोबदल्यात मिळविले आहेत. पहिल्या सामन्यासाठी ड्युमिनी बाहेर डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे अगामी कसोटी सामन्यासाठी जेपी ड्युमिनी संघाच्या बाहेर असेल. त्याच्या उजव्या हाताचे टाके पुढील आठवड्यात काढण्यात येणार असल्याने तो या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. जलदगती गोलंदाज मोर्ने मोर्केल याने ५ षटके गोलंदाजी केली व एकही धाव दिली नाही. मात्र, सामन्यापूर्वी त्याचीदेखील शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार असल्याचे डोमिंगो याने सांगितले. मात्र, अगामी सामना हा पूर्णपणे खळपट्टी कशी असेल, यावर अवलंबून आहे, असे मतही त्याने व्यक्त केले. संक्षिप्त धावफलक : भारत अध्यक्षीय संघ : ७८.५ षटकांत सर्व बाद २९६ (लोकेश राहुल झे. प्लेसिस गो. सिमॉन हार्मर ७२, करुण नायर झे. विलास गो. फिलँडर ४४, नमन ओझा झे. आमला गो. स्टेन ५२, हार्दिक पंड्या झे. विलास गो. हार्मर ४७, स्टेन ३/४६, हार्मर ३/४१, फिलँडर २/३७); दक्षिण आफ्रिका : ६९.२ षटकांत सर्व बाद ३०२ (एबी डिव्हिलियर्स त्रि.गो. यादव ११२, डेन विलास त्रि. गो. यादव ५४, डेल स्टेन ३७ त्रि.गो. कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर ४/७०, जयंत यादव २/३७, कुलदीप यादव २/२४).