शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यूएस ओपनमधून शारापोवाची माघार

By admin | Updated: August 31, 2015 23:57 IST

जागतिक क्रमवारीतील नंबर दोनची खेळाडू रशियाची मारिया शारापोवा हिने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील नंबर दोनची खेळाडू रशियाची मारिया शारापोवा हिने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे वर्षाच्या अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपन सुरू होण्याआधीच चाहत्यांना आज एक मोठा धक्का बसला. पाच वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन शारापोवाने सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली. ती म्हणाली, ‘‘दुर्दैवाने मी या वर्षाच्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. मी स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; परंतु त्यात यश मिळाले नाही. काही आठवड्यांनंतर मी कोर्टवर पुनरागमन करीन.’’रशियन सुंदरी शारापोनाने माघार घेतल्यानंतर स्पर्धेच्या आकर्षणालादेखील नक्कीच धक्का बसणार आहे. शारापोवाने या वर्षी जुलै महिन्यात अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सविरुद्ध विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर एकही सामना खेळला नाही. तिने पायाच्या दुखापतीमुळे सिनसिनाटी स्पर्धेतूनही माघार घेतली होती. दुखापतीमुळे वर्षाच्या अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी न होण्याची शारापोवाची तीन वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. शारापोवाने २००३मध्ये प्रथम या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. द्वितीय मानांकित शारापोवाच्या जागी रशियाच्या दारिया कसात्किनाला स्पर्धेत प्रवेश देण्यात आला आहे. शारापोवा यूएएस ओपन स्पर्धेत खेळत नसल्यामुळे सेरेना विल्यम्सचा या वर्षातील अखेरची स्पर्धा जिंकण्याचा मार्ग सुकर होणार आहे. सेरेना विल्यम्ससाठी शारापोवा सर्वांत कठीण प्रतिस्पर्धी होती. (वृत्तसंस्था)