शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

श्रीकांतकडून सोन वानला धक्का

By admin | Updated: June 23, 2017 00:59 IST

सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारताच्या किदाम्बी श्रीकांतने आॅस्टे्रलिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत

सिडनी : सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारताच्या किदाम्बी श्रीकांतने आॅस्टे्रलिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद करताना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कोरियाच्या सोन वान याला पराभूत केले. विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात इंडोनेशिया ओपनच्या उपांत्य सामन्यात श्रीकांतने सोनला स्पर्धेबाहेर केले होते. पुन्हा एकदा त्याने या कामगिरीची पुनरावृत्ती करताना दिमाखात आॅस्टे्रलिया ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे, बी. साई प्रणीत, पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या प्रमुख खेळाडूंनीही आपआपल्या सामन्यात बाजी मारताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने आपल्या कामगिरीमध्ये कमालीचे सातत्य राखताना ५७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात सोन वानचे तगडे आव्हान १५-२१, २१-१३, २१-१३ असे परतावले. पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर श्रीकांतने झुंजार पुनरागमन केले. या वेळी, त्याच्या आक्रमकतेपुढे सोन वानचा काहीच निभाव लागला नाही. दमदार स्मॅश आणि नेटजवळील नियंत्रित खेळाच्या जोरावर श्रीकांतने सोन वानला बेजार केले. दुसरीकडे, साई प्रणीतनेही झुंजार विजय मिळवताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात प्रणीतने चीनच्या हुआंग युक्सियांगचे आव्हान ६४ मिनिटांमध्ये २१-१५, १८-२१, २१-१३ असे संपुष्टात आणले. महिलांमध्ये भारताच्या दोन्ही प्रमुख खेळाडूंनी विजयी कूच कायम राखल्याने जेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत. स्पर्धेत पाचवे मानांकन लाभलेल्या आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने सरळ दोन गेममध्ये बाजी मारताना चीनच्या चेन झियोझिनचा केवळ ४६ मिनिटांमध्ये २१-१३, २१-१८ असा धुव्वा उडवला. चिनी तैपईची अव्वल मानांकित ताइ त्झू यिंग हिचे कडवे आव्हान सिंधूपुढे उपांत्यपूर्व फेरीत असेल. अन्य सामन्यात गतविजेत्या सायना नेहवालने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना मलेशियाच्या सोनिया चेयाहविरुद्ध २१-१५, २०-२२, २१-१४ असा झुंजार विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत सहावे मानांकन असलेली चिनी खेळाडू सुन यू हिचे तगडे आव्हान सायनापुढे असेल. (वृत्तसंस्था)महिला दुहेरीमध्ये अश्विन्नी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी यांना शिहो तनाका-कोहारु योनेमोटो या जपानच्या सहाव्या मानांकित जोडीविरुद्ध २१-१८, १८-२१, १३-२१ असे पराभूत व्हावे लागल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले. तसेच, पुरुष दुहेरीतही सात्त्विक साईराज रंकिरेड्डी-चिराग शेट्टी यांना चिनी तैपईच्या चेन हुंग लिंग - वांग ची लिन यांच्याविरुद्ध १६-२१, १८-२१ने पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत प्रणीत आणि श्रीकांत एकमेकांविरुद्ध खेळतील. विशेष म्हणजे, सिंगापूर ओपन स्पर्धेचा अंतिम सामना याच दोन खेळाडूंमध्ये झाला होता. त्या वेळी प्रणीतने बाजी मारत जेतेपद पटकावले होते. या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी या वेळी श्रीकांतकडे असेल.